ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव पाचोरा तालुक्यातील लोहारा गटातील रामेश्वर जमीन घोटाळा: चौकशी रखडल्याने तहसीलदार, बीडीओ संशयाच्या भोवऱ्यात! प्रत्येक वेळेस सांगतात आमचा त्याच्यात काहीच रोल नाही मग रोल करतो कोण? याचा अर्थ सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक झाली पाहिजे सत्य गोष्ट नेहमी लपवली जाते असत्याच्या मागे किती दिवस साथ देणार? सत्य किती दिवस लपवणार पैशाच्या लालची मुळे पगार असून सुद्धा? शेतकरी अनुदान घोटाळा शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार_ _


रामेश्वर जमीन घोटाळा: चौकशी रखडल्याने तहसीलदार, पंचायत समितीचे बीडीओ संशयाच्या भोवऱ्यात पाचोरा तालुक्यातील मौजे रामेश्वर येथील गट क्र. 69/अ मधील शासकीय जमीन वाटपात झालेल्या कोट्यवधींच्या कथित भ्रष्टाचार आणि बोगस कागदपत्रांच्या प्रकरणाला नवा मोड मिळाला आहे. या गंभीर घोटाळ्याची चौकशी करण्यात पाचोरा येथील तहसीलदार आणि गटविकास अधिकारी (BDO) जाणीवपूर्वक दप्तर दिरंगाई करत असून, ते दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा थेट आरोप अर्जदारांनी केला आहे. या प्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (CEO) एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.तपास अधिकारी बाहेरचे द्या!
अर्जदार प्रेमचंद मकराम राठोड यांनी 3 फेब्रुवारी 2026 रोजी पुराव्यांसह तक्रार देऊनही स्थानिक प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. स्थानिक अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरच संशय असल्याने, या प्रकरणाच्या चौकशीसाठी बाहेरील जिल्ह्यातील किंवा तालुक्याबाहेरील अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.सर्व पुरावे देऊनही चौकशी रेंगाळत ठेवणे म्हणजे दोषींना पाठबळ देण्यासारखे आहे. वरिष्ठ स्तरावरून तात्काळ हस्तक्षेप न झाल्यास तीव्र कायदेशीर लढा उभारला जाईल.”शेतकरी अनुदान घोटाळा शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार
— अर्जदार: प्रेमचंद राठोड, (रामेश्वर)


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button