ताज्या बातम्या

जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार जप्त केलेले साहित्य हलवण्यास सुरुवात जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांचे आदेश


जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या 17 मजली प्रशासकीय इमारतीखालील अतिक्रमण विभागाने जप्त केलेले अतिक्रमित साहित्य तात्काळ दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचे आदेश महापौर दीपमाला काळे यांनी मागील महिन्यात दिले होते त्यानुसार हे साहित्य ईश्वर कॉलनी परिसरातील लाठी विद्यालय या निश्चित केलेल्या जागेवर हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. शनिवार संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण होणार असून, शुक्रवारी १९ जून रोजी महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.महापौर दीपमाला काळे यांनी पाहणी दरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला आणि सदर जागा लवकरात लवकर पूर्णपणे रिकामी करण्याचे निर्देश दिले. प्रशासकीय इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त झाल्यानंतर या रिकाम्या झालेल्या जागेचा वापर प्राथमिक स्वरूपात वाहन पार्किंगसाठी करण्यात येणार आहे.जागा निश्चिती 17 मजली इमारतीखालील जप्त साहित्य ठेवण्यासाठी ईश्वर कॉलनीतील लाठी विद्यालयाची जागा निश्चित करण्यात आली आहे. शनिवार संध्याकाळ पर्यंत सर्व अतिक्रमित साहित्य लाठी विद्यालयात हलवले जाईल, अशी माहिती अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली साहित्य हलवल्यानंतर रिकाम्या होणाऱ्या जागेवर नागरिकांच्या सोयीसाठी प्राथमिक स्वरूपात वाहन पार्किंग व्यवस्था केली जाणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button