संमिश्र न्यूज बीडमध्ये 10 कोटी रुपये किमतीचा सुगंधीत गुटका सुपारी नष्ट न करता खोटे पंचनामे केल्यामुळे 4 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला तर 21 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार /// वाशिम जिल्ह्यात ब्लॅकमेल करून सुमारे 3 वर्ष लैंगिक अत्याचार केल्यामुळे 19 वर्षीय तरुणी गर्भवती वाशिम जिल्ह्यातील कारंजा मधील अत्याचारी किराणा दुकानदाराच्या विरोधात पोस्को गुन्हा दाखल

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त मा: तुकाराम मुंढे यांनी परत कार्यवाहीला सुरुवात केली बीड जिल्ह्यात सुमारे 10 कोटी रुपयांची सुगंधित गुटखा सुपारी नष्ट न करता खोटे पंचनामे केल्याने 21 अधिकाऱ्यांवर कार्यवाहीची टांगती तलवार तर 4 बडे अधिकारी यांना घरचा रस्ता दाखवला सध्या बीड जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी द्वेष भावनेतून आणि जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी कार्यवाही करीत आहे अशी माहिती मिळाल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाचे मुख्य आयुक्त तुकाराम मुंडे यांनी त्या अधिकाऱ्यांवर कार्यवाहीचा बडगा उचलला आहे निलंबित 4 अधिकाऱ्यांमध्ये 2 अन्नसुरक्षा अधिकारी असून नागपूरचे सहाय्यक आयुक्त आणि पुण्याच्या एका सहआयुक्तांचा समावेश आहे त्यामुळे 4 बड्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे तर 21 अधिकाऱ्यांवर टांगती तलवार बेकायदा पद्धतीने छापा टाकून आणि त्या मालाची नियमबाह्य जप्ती करणे खोटे पंचनामे केल्यामुळे कार्यवाही करण्यात आली आता दिवाळी जवळ आली असून प्रत्येक व्यापाऱ्यांनी डुबलीकेट वस्तू वापरून कोणतेही खाद्यपदार्थ तयार करू नये त्यामुळे चौकशीला सामोरे जाण्यापेक्षा आपले कार्य व्यवस्थित पार पाडा असे आव्हान अन्न व औषध प्रशासनाचे राज्य आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे///////////// त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली शेजारी राहणाऱ्या एका 45 वर्षीय किराणा दुकान चालवणारा इसमाने 19 वर्षीय तरुणीला ब्लॅकमेल करून तीन वर्षे अत्याचार केल्यामुळे तरुणी गर्भवती राहिल्याचे उघड झाले या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून कारंजा शहर पोलीस आणि आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) पोस्को या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे दरम्यान किराणा चालवणारा आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे












