ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका भडगाव येथील वाळू चोरी रोखण्यासाठी वाक ग्रामस्थ एकवटले अवैध वाळू वाहतुकी विरोधात ग्रामस्थ आक्रमक त्यानंतर एरंडोल येथील लाखो रुपये किमतीचे वाळूचे ढिगारे जप्त कासोदा येथे पोलिसांची वाळूवर कार्यवाही _ कार्यवाहीचा दिखावा का ? शासन प्रशासना मधील अधिकारी तलाठी वर्ग मिली_ भगत करीत आहे? लोकांना दाखवत काही आहे करीत काय आहे ज्यांनी पैसे हप्ते दिले त्यांनाच सूट मग ते त्यांच्या नाकावर टिचून समोरून जातात🙆‍♂️ ाळूच्या ढिगार्‍यांवर तात्पुरती कार्यवाही कॉन्ट्रॅक्टरांनी घेतलेली वाळूचे गणित_? अधिकारी तलाठी मालामाल बाहेर गावाहून आलेले अधिकारी यांच्या करोडो रुपयांच्या इस्टेट गाड्या बंगले यांची चौकशी लावणार का? शेवटी सर्वांची नार्को टेस्ट झालीच पाहिजे_ _


भडगाव प्रतिनिधी विजय माळी वाळू चोरी रोखण्यासाठी वाक ग्रामस्थ एकवटले अवैध वाळू वाहतुकीविरोधात ग्रामस्थ आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांसह प्रांत व तहसीलदार यांना निवेदन देणार भडगाव तालुक्यातील वाक परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांनी आता एकजूट दाखवत ठोस भूमिका घेतली आहे. गावातील वाळू चोरी पूर्णपणे बंद करण्यात यावी, तसेच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी तलाठी, ग्रामविस्तार अधिकारी व पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपस्थित ग्रामस्थांनी अवैध वाळू वाहतूक बंद करण्याची एकमुखी मागणी केली.
वाळू चोरीच्या प्रश्नावर आयोजित या बैठकीत वाक परिसरातील परिस्थिती, अवैध वाळू वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या होणाऱ्या नुकसानाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. वाळू हा निसर्गातील महत्त्वाचा घटक असून, त्याचे अनधिकृत उत्खनन व वाहतूक झाल्यास पर्यावरणावर तसेच परिसरातील नैसर्गिक समतोलावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या प्रकाराला वेळीच आळा घालणे आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.बैठकीत ग्रामस्थांची एकमुखी मागणी वाक परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याच्या प्रश्नावर ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली. संबंधित यंत्रणेने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. केवळ बैठका घेऊन प्रश्न सुटणार नाही, तर प्रत्यक्ष कारवाई करून अवैध वाळू वाहतूक बंद होणे आवश्यक असल्याची भूमिका ग्रामस्थांनी मांडली.बैठकीला तलाठी, ग्रामविस्तार अधिकारी आणि पोलीस पाटील उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गावातील वाळू चोरीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
तहसीलदार, प्रांताधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार
वाक परिसरातील अवैध वाळू वाहतूक पूर्णपणे थांबवण्यासाठी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यानुसार तहसीलदार, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन वाळू चोरीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात येणार आहे. तसेच संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे
.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button