लोकशाहीची थट्टा सुमारे 30 ते 40 तक्रारी शासकीय यंत्रणेकडे प्रलंबित चौकशी का होत नाही? सामाजिक कार्यकर्ता तक्रारदार गणेश कौतिक ढेंगे ////उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार येथे आरटीओ म्हणून उत्तम जाधव नेमणुकीस असताना परिवहन विभागाच्या नियमांचे व कायद्यांचे पालन न करता बेकायदेशीरपणे वाहने तपासणी न करता 13 वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र दिले व 3 महत्वपूर्ण तक्रारी असताना त्यांची बदली भडगाव येथे झाली आणि दिनांक 30/ 10 /2026 रोजी सेवानिवृत्त होत आहे वरील तीनही तक्रारीची चौकशी झाल्याशिवाय त्यांना त्यांच्या रिटायरमेंटचे व पेन्शनचे कोणतेही लाभ देण्यात येऊ नये अशी तक्रार व आरोप गणेश ढेंगे दाखल केले आहे

तक्रार अर्ज दिनांक 19 /10 /2026 तक्रारदार गणेश कौतिक ढेंगे वय वर्ष 48 सामाजिक कार्यकर्ता आतापर्यंत केलेल्या तक्रारीची दखल घेण्याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार येथे 133 वाहनांची बनावट नोंदणी करून 66 लाख रुपयांचा शासकीय भ्रष्टाचार त्यानंतर दिनांक 18 /10 /2026 रोजी चांदसोली यात्रेवरून परत येत असताना अवैध प्रवासी वाहतूक 8 सामान्य निष्पाप व्यक्तींचा मृत्यू झाला त्याला जबाबदार कोण गरिबांचे संसार रस्त्यावर त्या व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत असलेले उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार येथे 13 वाहनांचे बेकायदेशीर रित्या त्यांना दिलेले 38 A प्रमाणपत्र बनावट योग्यता प्रमाणपत्र दिले उत्तम लक्ष्मण जाधव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आता भडगाव येथे कार्यरत असून त्यांना भडगाव येथे रिटायरमेंट चे सर्व पेन्शनचे फायदे संपूर्ण चौकशी केल्याशिवाय लाभ देण्यात येऊ नये वरील विषयास अनुसरून तक्रारदार गणेश कौतिक ढेंगे यांनी सांगितले त्यानंतर 19 /10/ 2026 रोजी तक्रारदाराने पुन्हा माहितीस्तव तक्रार अर्ज केला असून त्या तक्रार अर्जाची चौकशी होऊन जनतेला म्हणजेच लोकशाही प्रणालीला न्याय द्यावा वरील सर्व अर्ज शासकीय यंत्रणेकडे प्रलंबित असून अर्ज प्रलंबित का ठेवले? विशेषतः आरटीओ उत्तम जाधव त्यांच्या अखत्यारित नोंदणी अधिकारी म्हणून कार्यरत असताना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार येथे 133 बनावट वाहनांची नोंद केलेली आहे त्यापैकी 83 वाहनान संदर्भात सायबर पोलीस स्टेशन नंदुरबार येथे गुन्हा क्रमांक 395/ 2022 दिनांक 28/ 6 /2022 रोजी नोंद झालेली आहे त्यात सरकारी महसूल बुडाल्याचा अंदाज सुमारे 66,59,900 रुपयांचा झालेला आहे शासनात झालेली हानी आणि नंतर तो भार नागरिकांवर पडतो मग चोरा करणाऱ्यांच्या भरपाईचा खर्च नागरिकांनी भरावा का? कशासाठी प्रत्येक वेळेस कोणीही भ्रष्टाचार करत आहे आणि जनतेला महागाईच्या तडाख्यात झळ सोसावी लागत आहे वरील सर्व गैरकारभारात आरटीओ उत्तम जाधव हे नोंदणी प्राधिकारी असून देखील त्यांना वगळले गेले म्हणजेच शासनाचे अधिकारी पैसे घेऊन प्रकरण दाबत आहे का? त्यानंतर राज्यातील इतर जिल्ह्यातील नोंदणी झालेले 50 वाहने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार येथे बनावट नोंदणीचा गैरप्रकार घडला असून या प्रकरणात झालेल्या शासकीय महसुलीची हानी संदर्भात गुन्हा नोंद आहे दिनांक 18/ 10/ 2025 रोजी उत्तम जाधव हे नंदुरबार जिल्ह्याचे आरटीओ अधिकारी प्रमुख असताना त्यांना प्रश्न विचारला तर ते म्हणतात माझ्या कार्यकाल मध्ये गैरप्रकार झालेलं नाही म्हणून त्यांची सखोल चौकशी होऊन शासनाचा आणि जनतेचा बुडालेला पैसा चौकशी झाल्याशिवाय त्यांना रिटायरमेंट चे व पेन्शनचे कोणतेही लाभ देण्यात येऊ नये











