ताज्या बातम्या
जिल्हा जळगाव भडगाव तालुक्यातील कोळगावात महात्मा फुले स्मारकासाठी जागा द्या ! ग्रामस्थांची मागणी !

भडगाव (प्रतिनिधी) विजय माळी
कोळगाव येथे महात्मा ज्योतिराव फुले यांचे स्मारक उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे. 14 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत गणपती मंदिराजवळील जागेबाबत चर्चा झाली होती; मात्र अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही. 25 ऑक्टोबर 2026 पर्यंत जागेबाबत लेखी निर्णय घेऊन कार्यवाही करावी; अन्यथा 26 ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामपंचायतीने या मागणीची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.








