ताज्या बातम्या

संपादकीय सट्टा मटका जुगार सिस्टीम कोणासाठी राबवली जाते पैसे कोण घेतो? ही योजना फक्त जिल्ह्यापूर्तीच मर्यादित का? हिंदू हिंदूंना लुटत आहे/ काय डोळे झाकले का लुटमार करणाऱ्यानो आणि आम्हाला अक्कल शिकवणाऱ्यांनो तुम्ही स्वतः संविधानाच्या विरोधात वागत आहे आम्हाला ज्ञान शिकवतात आणि अचानक ज्यावेळेस डीआयजी पथक सट्टा मटका बुकीवर मालक-चालक यांच्यावर छापा टाकतात त्यावेळेस दोन नंबर धंद्यांचा खुलासा_ _याचा अर्थ वरपर्यंत हप्ते जात नव्हते का? खालच्या खालीच वाटप होत होती? लातूर जिल्ह्यातील पोलीस एलसीबी यांची अब्रू रस्त्यावर याला सिस्टीम म्हणतात हा आमचा देशाचा विकास


जिल्ह्यांमध्ये काय सुरू आहे सट्टा मटका जुगार सुरू असून रस्त्यावर सुद्धा सट्टा मटका जुगार मोठ्या प्रमाणात दिसून येते ज्यावेळेस ही सिस्टीम मा: डीआयजी साहेबापर्यंत पोहोचते त्यावेळेस अचानक धाड लातूर मधील गोविंद पाटील विजय लांडगे यांच्या सट्टा मटका जुगार अड्ड्यावर कार्यवाही करत 15 जणांवर गुन्हा दाखल झाला पण या कार्यवाहीत सगळ्यात मोठा आरोपी संशयाच्या भोऱ्यात उभा आहे ते म्हणजे स्थानिक पोलीस ते एलसीबी आणि एस पी यंत्रणा प्रत्येक रस्त्यावर गल्लीबोळा प्रचंड प्रमाणात सट्टा मटका जुगार सुरू होता यामुळे अनेक जण देशोधडीला लागले अनेकांचे संसार उध्वस्त झाले त्यांचे काय तर काही आत्महत्या करून मेले सट्टा मटका चालक-मालक यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही त्यामुळे लहान मुलांना सुद्धा माहिती झाली की या टपरीमध्ये काय चालतं त्यांच्यावर काय परिणाम होतील याचा विचार सरकारने केला पाहिजे ठोस उपाय का होत नाही जर असे सक्षम अधिकारी प्रत्येक जिल्ह्याला लाभले तर खरोखर सट्टा मटका जुगार बंद होतील लातूरचे डीआयजी अधिकारी यांनी थेट एसपी यंत्रणेपासून पोलिसांपर्यंत विचारले असता त्यांचे उत्तर आम्हाला माहीत नव्हते असे सांगत होते हा अज्ञानाचा अभिनय होता का झालेल्या हप्ते खोरीमुळे त्यांची बांधलेली तोंड असा सवाल जनता विचारत आहे डीआयजी साहेबांचे पथक शहरात पाऊल टाकतात त्यांना बरोबर आठ ते सापडतात आरोपी सापडतात रोख रक्कम सापडते मग स्थानिक एसपी पासून ते पोलिसांपर्यंत ही सगळी माहिती असून त्यांना दिसत नाही का? लातूर शहरात उघडत्याच्या मटका बंद झाला नाही फक्त हप्त्याची लाईन तात्पुरती बंद झाली जर संरक्षण नव्हतं तर मटका बुकी इतक्या बिनधास्तपणे सट्टा मटका जुगार कसे चालवत होते? आणि त्यांना संरक्षण होतं तर संरक्षण कोण देत होते यामुळे लातूर जिल्ह्यात एस पी पासून ते पोलिसांपर्यंत प्रतिमा धुळीच मिळाली आता कार्यवाही कुणावर हा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे? वरून आदेशाला तेव्हा खालच्या ना अचानक जाग आली डीआयजी पथक रोज येणार आहे का? कारण ते आले तरच कायदा जिवंत राहील का असा सवाल जनता करीत आहे हा छापा नवे तर सट्टा मटका जुगारावरती पोटभरू डांगऱ्यांना जोरदार चपराक आहे हे दोन नंबर धंदेवाले समाजात अशाप्रकारे वावरतात की कुठेही गेला तरी यांना पहिले मान असतो ते पोलीस स्टेशन असो किंवा कुठे कार्यक्रम असो पर हप्ते कोरीच्या संशयावर पडलेली जोरदार कार्यवाही आहे पण हप्त्याचं मूळ अजूनही अंधारातच सट्टा पत्ता जुगार चालवणाऱ्या चालक-मालक यांच्याजवळ सुरुवातीला काय होते याची सीबीआय चौकशी लावली पाहिजे कायदा फक्त जनतेला आहे का? असा सवाल लातूरची जनता करीत आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button