8 हजार सायकलिस्टच्या भव्य रिंगणाने वेधले संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष जळगावच्या ग्रुपसोबत महापौर दीपमाला काळे जळगांव शहराच्या महापौर सौ.दिपमाला काळे यांच पंढरीच्या पुण्य _नगरीमध्ये स्वागत करताना जळगांव ते पंढरपूर सायकल वारी 520 कि.मी. जळगांव हुन 200 वारकरी सायकली वरती पंढरपूरच्या वारीला जळगांवच्या महापौर सौ.दिपमाला काळे यांच पंढरीच्या पुण्यनगरीमध्ये स्वागत करतानामा प्रदेशाध्यक्ष छावा मराठा युवा महासंघ छावा मराठा युवा महासंघ मा.नागेश दादा कदम पाटील

जळगाव/पंढरपूर : जळगाव सायकलिस्ट ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेली वार्षिक पंढरपूर सायकल वारी यंदाही अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. महापौर दीपमाला मनोज काळे यांनी स्वतः सायकल चालवत सलग दुसऱ्या वर्षी या वारीमध्ये सहभाग घेतला. रविवारी पंढरपुरात राज्यभरातून आलेल्या 8 हजार सायकलिस्टनी सुरुवातीला पंढरपूर शहराला फेरी मारून नंतर घडवून आणलेल्या भव्य आणि शिस्तबद्ध सायकल रिंगणाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले.वारीच्या सांगता सोहळ्यात रविवारी, दिनांक 12 जुलै रोजी पंढरपूर येथे एक अभूतपूर्व सोहळा रंगला. संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेल्या विविध सायकलिस्ट ग्रुपच्या सुमारे 8 हजार सायकलपटूंनी पंढरपूरमध्ये सायकलचे एक मोठे आणि भव्य रिंगण तयार केले. या आधी पंढरपूर शहराला देखील त्यांनी पूर्ण एक फेरी मारून मग रिंगण बनवून ते पूर्ण केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही हे शिस्तबद्ध आणि विहंगम रिंगण पाहण्यासाठी पंढरीत मोठी गर्दी झाली होती. या सायकल रिंगणाने प्रत्येक भाविकाचे डोळे आणि मन मोहून घेतले. या ऐतिहासिक रिंगण सोहळ्यात जळगावच्या महापौर दीपमाला काळे आणि जळगावातील 75 सायकलिस्ट असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभागी झाले होते.जळगांव ते पंढरपूर सायकल वारी 520 कि.मी. जळगांव हुन 200 वारकरी सायकली वरती पंढरपूरच्या वारीला जळगांवच्या महापौर सौ.दिपमाला काळे यांच पंढरीच्या पुण्यनगरीमध्ये स्वागत करताना
मा.प्रदेशाध्यक्ष
छावा मराठा युवा महासंघ
मा.नागेश दादा कदम पाटील








