जळगाव शहराच्या प्रथम नागरिक सन्माननीय महापौर सौ दीपमाला ताई काळे यांच्या वाढदिवसा निमित्त आज भाजपा प्रभु श्रीराम आयोध्या मंडल क्रं. 4 च्या वतीने शिंधी कॉलनी परिसर येथें रस्त्याच्या डीवायडर च्या मध्यभागी, वृक्षारोपण करण्यात आले सदर कार्यक्रमाला महानगर अध्यक्ष श्री दिपक सूर्यवंशी, नगरसेवक श्री प्रकाश बालाणी, नगरसेवक, श्री रीतीक ढेकळे, मंडल अध्यक्ष श्री विनोद मराठे, माजी मंडल अध्यक्ष श्री पिंटूभाऊ काळे, प्रसिद्धी प्रमुख श्री मनोज भांडारकर, जेष्ठ कार्यकर्ते अशोक कोष्टी, मालवाहतूक रिक्षा स्टॉपचे श्री धनराज बागुल, श्री विजय लाडवंजारी, श्री संदीप खरे, श्री संतोष मिस्तरी, श्री चंदू नाथ श्री राजेश जोशी, आदी उपस्थित होते

भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर छत्रपती शिवाजी महाराज मंडल क्र 1येथे जळगाव चे प्रथम नागरिक, महापौर दीपमाला ताई काळे यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला..कार्यक्रमाला उपस्थिती महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, गट नेते प्रकाश बालानी, मनोज काळे, राजेंद्र मराठे, मिलिंद चौधरी , मंडल अध्यक्ष आनंद सपकाळे, उमेश देशपांडे, राहुल संकत, हर्षल सिखवाल, धनंजय पाटील,रवी सोनवणे,युवराज सपकाळे, जुने जळगाव मित्र मंडळाचे पंकज काळे, भास्कर पाटील, प्रशांत सरोदे, दीपक खडके, दिगंबर खडके उपस्थित होते..महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग 7 मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान जळगाव (प्रतिनिधी) : शहराच्या महापौर दीपमाला मनोज काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या मंडळ क्रमांक 2 तर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिर घेऊन महापौरांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि सेवाभावी वृत्तीने साजरा करण्यात आला.साईबाबा मंदिरात रक्तदान शिबिर वाढ_ दिवसानिमित्त डेमला कॉलनी येथील प्रसिद्ध साईबाबा मंदिरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी परिसरातील नागरिक, तरुण आणि भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संकट काळात रक्ताचा तुटवडा भासू नये, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.गजानन, नंदनवन कॉलनी परिसरात वृक्षारोपण पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गजानन कॉलनी व नंदनवन कॉलनी परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या रोपांचे संगोपन व जतन करण्याचा संकल्पही कार्यकर्त्यांनी केला.या सामाजिक उपक्रमांप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेविका ॲड. शुचिता हाडा, नगरसेविका अंकिता पंकज पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य माधुरी अत्तरदे, माजी नगरसेवक मनोज काळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश पाटील, जिल्हाचिटणीस मिलिंद चौधरी, मंडळाचे सरचिटणीस चेतन तिवारी, पंकज पाटील, तसेच रेखा वर्मा, दीप्ती चिरमाडे, सरोज पाठक, राजनंदिनी राणा, सुमित्रा पाटील, केदार देशपांडे, आजू पटेल, अरुण भोळे, सुनील कासट, मनोहर बारी, सनी पटेल, रुपेश राणे, ऋषिकेश शिंपी, अविनाश भोळे, तुळशीराम नेमाडे,सुभाष ठाकूर, रोहित वाघ, धीरज वर्मा, भूषण पाटील, सुनील पाटील, महेंद्र मुंदडा, सुधाकर पाटील, नरेंद्र चौधरी, रमेश महाले, ज्ञानदेव नारखेडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, प्रभागातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













