जिल्हा जळगाव तालुका भुसावळमध्ये 29 लाखांच्या पैशांच्या वादातून तरुणाचा खुन; दोघे संशयित ताब्यात 1 दिवसात गुन्हेगाराचा शोध भुसावळ पोलिसांना यश

भुसावळ प्रतिनिधी गोपी अण्णा
भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरातील फार्म हाऊसवर पैशांच्या व्यवहारातून एका 21 वर्षीय तरुणाला मारहाण करून त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.मृत तरुणाचे नाव भूषण उल्हास वावरे असे आहे. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली असून, तिसऱ्या संशयितालाही लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
पोलिसांकडे मयताचा भाऊ विशाल उल्हास व्हावले याने दिलेल्या फिर्यादीनुसार, भूषण याला 7 ऑक्टोबर रोजी दुपारी एका व्यक्तीचा फोन आल्यानंतर तो घराबाहेर गेला. त्याच्यासोबत त्याची आईही गेली. सायंकाळी साक्री फाटा परिसरातील संजय आवटे यांच्या फार्म हाऊसवर कुटुंबीय पोहोचले असता भूषण तेथे बसलेला दिसला. यावेळी संजय आवटे व त्याच्यासोबत अन्य दोन व्यक्ती उपस्थित असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.संजय आवटे यांनी भूषणकडून 34 लाख रुपये घेतले होते, त्यापैकी 5 लाख रुपये परत केले असून 29 लाख रुपये बाकी असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. पैसे आणून देण्याचे आश्वासन देऊनही भूषणला तेथून सोडण्यात आले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.दरम्यान, रात्री भूषणने कुटुंबीयांशी फोनवर संपर्क साधून पैसे जमले का, अशी विचारणा केली होती. मात्र त्यानंतर त्याचा फोन संपर्कात आला नाही.8 ऑक्टोबर रोजी सकाळी भूषणचा मृतदेह अलीशान वॉटर पार्कसमोरील पुलाजवळ, राष्ट्रीय महामार्गालगत सर्व्हिस रोडवर आढळून आला. त्याला ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेण्यात आले. तेथे कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटवली.भूषणच्या उजव्या डोळ्याखाली जखम, उजव्या कानातून रक्तस्राव तसेच हात व पाठीवर खरचटल्याच्या आणि काळेनिळे डाग असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या घटनेप्रकरणी भूषणचा भाऊ विशाल उल्हास वावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय आवटे व त्याच्यासोबतच्या दोन इसमांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. पैशांच्या वादातून भूषणला फार्म हाऊसवर मारहाण करून गंभीर जखमी केले आणि त्यानंतर महामार्गालगत फेकून दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात संजय दत्तु आवटे व प्रमोद l लाहोरिया, राहानारा साक्री फाटा रा . भुसावळ या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिसऱ्या संशयितालाही लवकरच ताब्यात घेतले जाणार आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन ट्रामा सेंटर येथे करण्यात आले असून पुढील तपासपोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल तायडे करीत आहे .











