ताज्या बातम्या

संमिश्र न्यूज 15 वर्षीय विद्यार्थ्यासोबत शिक्षिका हॉटेलमध्ये सापडली!…पोलिसांची धडक कार्यवाही…२६ वर्षीय शिक्षिकेला अटक /////////15 महिलांची लग्न मॅट्रिमोनियल ॲपवरून ओळख लग्नाचे आमिष लग्नाच्या नावाखाली अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणारा एका महिलेच्या जाळ्यात अटकला आणि तो नरेंद्र शर्मा शेवटी पोलिसांच्या जाळ्यात अडकला


बेपत्ता विद्यार्थ्याचा मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी घेतला शोध; शिक्षिकेने प्रेमसंबंध असल्याचा केला दावा प्रकरणाचा तपास सुरू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते मात्र उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून समोर आलेल्या एका घटनेमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो लखनऊ येथील एका हॉटेलमध्ये 26 वर्षीय शिक्षिकेसोबत आढळून आला या प्रकरणी पोलिसांनी संबंधित शिक्षिकेला अटक केली असून तिच्याविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्यासह भारतीय न्याय संहितेअंतर्गत (BNS) गुन्हा दाखल करण्यात आला आहे रुपाली असे अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचे नाव असून ती बस्ती जिल्ह्यातील कप्तानगंज परिसरातील एका खासगी शाळेत कार्यरत होती विशेष म्हणजे, संबंधित विद्यार्थी याच शाळेत इयत्ता अकरावीत शिकत असून तो शाळेच्या व्यवस्थापकाचा मुलगा आहे विद्यार्थी बेपत्ता शिक्षिकेवर संशय संबंधित विद्यार्थी अचानक घरातून बेपत्ता झाला बराच वेळ शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने कुटुंबीय चिंतेत पडले विद्यार्थ्याच्या वडिलांनी जे संबंधित शाळेचे व्यवस्थापक आहेत मुलाचा शोध सुरू केला विद्यार्थ्याच्या एका वर्गमित्राकडून मिळालेल्या माहितीनंतर कुटुंबीयांना शिक्षिका रुपाली हिच्यावर संशय आला त्यानंतर विद्यार्थ्याच्या वडिलांनी कप्तानगंज पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली शिक्षिकेनेच आपल्या मुलाला सोबत नेल्याचा आरोप त्यांनी केला मोबाईल लोकेशनच्या आधारे लखनऊमध्ये शोध तक्रार दाखल होताच पोलिसांनी बेपत्ता विद्यार्थी आणि संबंधित शिक्षिकेचा शोध सुरू केला. तपासादरम्यान तांत्रिक पाळत आणि मोबाईल लोकेशनच्या मदतीने पोलिसांनी दोघांचा माग काढला या तपासातून दोघेही लखनऊ येथील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने हॉटेलमध्ये पोहोचून 15 वर्षीय विद्यार्थ्याला आणि शिक्षिकेला ताब्यात घेतले. दोघांनाही बस्ती येथे आणण्यात आले. पुढील तपासानंतर पोलिसांनी शिक्षिकेला अटक केली शिक्षिकेचा दावा; दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे सांगितले ‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार पोलिसांच्या चौकशीत शिक्षिका रुपाली हिने संबंधित विद्यार्थ्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा दावा केला दोघेही फिरण्यासाठी लखनऊ येथे गेल्याचे तिने सांगितल्याची माहिती समोर आली आहे मात्र शिक्षिकेचा हा दावा म्हणजे प्रकरणातील अंतिम सत्य नाही. अल्पवयीन विद्यार्थ्याच्या जबाबासह इतर पुरावे तपासल्यानंतरच संपूर्ण घटनेचे वास्तव स्पष्ट होणार आहे बाल कल्याण समितीसमोर हजर; विद्यार्थ्याला पालकांच्या स्वाधीन केले पोलिसांनी विद्यार्थ्याला शोधून काढल्यानंतर बाल कल्याण समितीसमोर (CWC) हजर केले. नियमानुसार त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच त्याचे समुपदेशनही करण्यात आले आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी बाल कल्याण समितीने विद्यार्थ्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. सध्या तो आपल्या कुटुंबासोबत आहे शिक्षिकेविरुद्ध POCSO आणि BNS अंतर्गत गुन्हा ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार या प्रकरणात शिक्षिकेविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 137(2) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 5 आणि 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोक्सो कायदा अल्पवयीन मुला-मुलींचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी लागू करण्यात आला आहे या कायद्यानुसार 18 वर्षांखालील प्रत्येक व्यक्तीला बालक मानले जाते. त्यामुळे पीडित मुलगा असो किंवा मुलगी, दोघांनाही या कायद्यांतर्गत समान संरक्षण मिळते तसेच आरोपी पुरुष असो किंवा महिला कायद्याच्या तरतुदींनुसार संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई होऊ शकते मात्र दाखल गुन्हा आणि आरोप न्यायालयात सिद्ध होणे या दोन वेगळ्या बाबी आहेत महिला आरोपी आणि अल्पवयीन मुलगा; सोशल मीडियावर चर्चेला उधाण या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे महिला आरोपी आणि अल्पवयीन मुलगा पीडित असल्याने या प्रकरणाकडे समाजाने कोणत्या दृष्टिकोनातून पाहावे, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे काही सोशल मीडिया पाहणाऱ्यांनी सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे तर काहींनी अशा घटनांकडे विनोद किंवा मनोरंजन म्हणून पाहण्याच्या मानसिकतेवर टीका केली आहे 15 वर्षांचा मुलगा हा कायद्याच्या दृष्टीने अल्पवयीन बालक आहे त्यामुळे प्रौढ व्यक्तीसोबतच्या त्याच्या कथित संबंधांकडे केवळ प्रेमप्रकरण म्हणून पाहता येणार नाही या प्रकरणात मुलाचे संरक्षण त्याचे मानसिक स्वास्थ्य आणि कायदेशीर प्रक्रिया यांना सर्वाधिक महत्त्व देणे आवश्यक आहे तपास सुरू; पुढील कारवाईकडे लक्ष या घटनेत पोलिसांनी विद्यार्थ्याचा शोध घेऊन त्याला सुरक्षितपणे कुटुंबीयांकडे सोपवले आहे मात्र, शिक्षिका आणि विद्यार्थ्यामधील नेमके संबंध काय होते विद्यार्थी घरातून कसा निघाला आणि लखनऊमध्ये काय घडले, याचा तपास अद्याप सुरू आहे या प्रकरणामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील विश्वासाचे नाते जपताना अल्पवयीन मुलांच्या संरक्षणाची जबाबदारी अधिक गांभीर्याने पार पाडण्याची गरज अधोरेखित झाली आहे आरोपांचे सत्य तपासातून आणि न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट होईल मात्र, अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही तडजोड होऊ नये, हा या घटनेतून समोर आलेला महत्त्वाचा मुद्दा आहे कलम 137 अल्पवयीन विद्यार्थी बेपत्ताउत्तर प्रदेश क्राईम न्यूजउत्तर प्रदेश पोलीसबस्ती क्राईम न्यूजबस्ती शिक्षिका प्रकरणबाल लैंगिक शोषण कायदामहिला शिक्षिका अटकलखनऊ शिक्षिका अटक लखनऊ हॉटेल प्रकरणशिक्षक विद्यार्थ्यांचे संबंध शिक्षिका विद्यार्थी प्रकरण अनेक ठिकाणी घडत असते ///लग्नाच्या नावाखाली विश्वास संपादन करायचा प्रेमाचे नाटककरून महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे व त्यांच्याशी शारीरिक संबंध अश्लील व्हिडिओ आतापर्यंत या बहाद्दर ने अनेक स्त्रियांना फसवून पैशाचे आमिष दिले आज-काल काही स्त्रियांना फक्त पैसा पाहिजे त्यामुळे असे लालूचचे प्रकार घडत आहेत हे संपूर्ण प्रकरण याचा उलगडा मेरठ जिल्ह्यातील जानी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 26 वर्षीय महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर झाला संबंधित महिलेने जीवनसाथीच्या शोधात एका मॅट्रीमोनियल ॲप वर नोंदणी केली होती याच ॲपवर 1 जुलै 2025 रोजी तिची ओळख नरेंद्र शर्मा नामक माणसाची झाली आरोपीने कथन केले की आपण मुंबईचे रहिवासी असून मुळगाव कुटुंब राजस्थान बिकानेर येथील असल्याचे सांगितले त्याचे वडील ब्रह्मप्रकाश शर्मा हे चार्टर्ड अकाउंट आहेत असे सांगितले त्याचे गोव्यात खाटू श्याम व अनेक ठिकाणी रिसॉर्ट व बंगले आहेत आपल्याला मुलीकडून काही नको आपली परिस्थिती चांगली आहे अशा मुलींना व त्यांच्या कुटुंबीयांना तो सांगत होता व एका मागून एक त्याने आतापर्यंत त्याने 15 लग्न केले


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button