जळगाव जिल्ह्यात एका मागोमाग गोळीबार कजगाव हादरले! पोलीस यंत्रणेवर चिंता व्यक्त केली जात असून पिस्तूल येतात कुठून? रोज घरफोडी खून दरोडे आणि गोळीबार जनता रामभरोसे ? नेमके जिल्ह्यात चालले तरी काय? कजगाव येथील कामावर जाणाऱ्या तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार; तरुण गंभीर जखमी प्रकृती चिंताजनक

प्रतिनिधी भडगाव कजगाव तालुका प्रतिनिधी आबा महाजन
भडगाव तालुक्यातील कजगाव येथील गोडगाव रोड परिसरात मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी एका तरुणावर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला असून, प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे या घटनेमुळे कजगावसह संपूर्ण परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे नेमकी घटना काय? प्राथमिक माहितीनुसार, जयेश नाना धोबी (पवार) हा तरुण नेहमीप्रमाणे पारोळा रस्त्यावरील एका सोलर कंपनीत कामावर जात होता गोंडगाव रोड परिसरात दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक गोळीबार केला या अनपेक्षित हल्ल्यात जयेश गंभीररीत्या जखमी झाला घटनेनंतर स्थानिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र त्याची प्रकृती अधिकच गंभीर असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला तात्काळ धुळे येथे हलवण्यात आले पोलिस यंत्रणा कामाला हल्लेखोरांचा शोध सुरू या गोळीबाराची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. हा गोळीबार नेमका कोणी केला आणि या हल्ल्यामागे काय कारण किंवा पूर्ववैमनस्य होते हे अद्याप अस्पष्ट आहे भर वस्तीजवळ घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून हल्लेखोरांच्या मुसक्या आवळून या प्रकरणाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे पोलिसांचा पुढील तपास वेगाने सुरू आहे

















