ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका भडगाव येथील माजी विद्यार्थी मंडळ विद्यार्थी साहाय्यक समिती पुणे’ च्या ‘भडगाव संपर्क केंद्राचे’ उद्घाटन


विद्यार्थी साहाय्यक समिती पुणे यांच्या माजी विद्यार्थी मंडळाचे संपर्क केंद्राचे उद्घाटन गोंडगाव बांबरुड प्र ब येथे संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री बी. बी. ननावरे सर प्रमुख उपस्थिती सरपंच राहुल पाटील विकास मंच सदस्य आणि ग्रामस्थ हे होते. विद्यार्थी सहाय्यक समितीची माहिती ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी हा मुख्य उद्देश हे केंद्र स्थापन करण्यामागचा असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष श्री गणेश काळे यांनी दिली 1956 साली पुण्यामध्ये विद्यार्थी साहाय्यक समितीची स्थापना झाली ग्रामीण भागातील गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये उच्च शिक्षणासाठी अल्प दरात निवास भोजन यांसह व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम शिक्षणानंतर नोकरी व्यवसायासाठी मार्गदर्शन समितीतर्फे राबविण्यात येत आहे अशी माहितीही देण्यात आली यावेळी मंडळाचे खजिनदार एडवोकेट देविदास टिळे, सभासद सीए संतोष घारे, क्षेत्रीय वन अधिकारी नीलम महाडिक दिपक मराठे, केंद्रप्रमुख नरेंद्र जयसिंग परदेशी श्री मच्छिंद्र शार्दुल श्री ललित मांडोळे श्री सतीश पाटील श्री राहुल सोनार श्री रातीलाल पाटील श्री भिकन परदेशी श्री भावलाल परदेशी श्री रविंद्र परदेशी श्री शरद परदेशी श्री कर्तार परदेशी श्री ओम पाटील श्री दीपक परदेशी सौ प्रतीक्षा परदेशी आदी उपस्थित होते तसेच मंडळाच्या वतीने माध्यमिक विद्यालय गोंडगाव’ येथे 100 देशी वृक्ष लावण्यात आले, त्यांचे वृक्षपूजन समितीच्या माजी विद्यार्थिनी, क्षेत्रीय वन अधिकारी सौ नीलम महाडीक व सौ रामकोरबाई जयसिंग परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. वृक्ष संगोपन प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला व पाण्यासाठी ठिबक सिंचन यंत्रणा कामाचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाची व्यवस्था श्री सैंदाणे सर, श्री जितू भैया पाटील, अक्षय परदेशी, सौरभ परदेशी व अपेक्षा परदेशी यांनी पाहिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार मुख्याध्यापक श्री बी. बी. ननावरे सर, सरपंच श्री राहुल पाटील व विकास मंच सदस्य श्री शशिकांत मराठे यांनी मानले


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button