ताज्या बातम्या

क्रांतिसूर्य महात्मा बिरसा मुंडा जयंती निमित्त जिल्हा जळगाव येथील भडगाव तालुक्यातील प्रशासन सज्ज; प्रशासनाने संविधानात दिलेले कलम कायदे 5 वी सूची व 6 वी सूची आदिवासींसाठी दिली आहे त्याची माहिती सांगितली पाहिजे नुसता गौरव करून शासन प्रशासन आदिवासीं बांधवांना त्यांच्या हक्क अधिकारापासून वंचित करीत आहे कारण आजकाल मंत्री पुढारी आमदार खासदार सगळे त्यांच्या घरचे वर्चस्व आणि हुकूमशाही करत आहे ही हुकूमशाही बंद झाली पाहिजे संविधानाने प्रत्येक सरकारी व सहकारी क्षेत्रात प्रत्येक जातीच्या लोकांना हक्क अधिकार दिले परंतु परत परत तेच तेच नको असतात तेच निवडून येतात त्याची माहिती सांगावी ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताहा’च्या नियोजनासाठी तहसील कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न


भडगाव प्रतिनिधी विजय माळी क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यभरात 11 ते 18 नोव्हेंबर 2026 दरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह-2026’ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचे भडगाव तालुक्यात अत्यंत उत्साहात आणि लोकसहभागातून नियोजन करण्यासाठी आज, दिनांक 12 नोव्हेंबर 2026 रोजी भडगाव तहसील कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली निवासी नायब तहसीलदार सुधीर सोनवणे आणि भडगावच्या नगराध्यक्षा रेखा मालचे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही नियोजन बैठक संपन्न झाली महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार भगवान बिरसा मुंडा यांचा त्याग संघर्ष आणि समाजसुधारणेचे कार्य सर्वदूर पोहोचवण्यासाठी या सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे 15 नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून मुख्य शासकीय कार्यक्रमाद्वारे साजरी केली जाणार आहे.सप्ताहातील प्रमुख उपक्रम आणि रूपरेषा या बैठकीत ११ ते 18 नोव्हेंबर दरम्यान राबवण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी उपक्रमांचा आढावा घेण्यात आला 11 व 12 नोव्हेंबर (जनजागृती व प्रसिद्धी): सप्ताहाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती मोहीम राबविणे 13 नोव्हेंबर (कल्याणकारी योजनांचा लाभ वाटप दिन): आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना, धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DA-JGUA), पीएम-जनमन (PM-JANMAN) आणि महिला बचत गटांना शासकीय योजनांचा लाभ वितरित करणे व नवीन अर्जांचे संकलन करणे 14 नोव्हेंबर (स्मारक स्वच्छता, दीपोत्सव व संस्कृती दर्शन): सर्व आदिवासी स्मारके व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करून सायंकाळी भव्य दीपोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे 15 नोव्हेंबर (मुख्य शासकीय दिन – बिरसा मुंडा जयंती): महात्मा बिरसा मुंडा व स्थानिक आदिवासी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहणे तसेच आदिवासी समाजातील कर्तृत्ववान व्यक्ती, पद्म पुरस्कार विजेते व स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा विशेष सत्कार करणे 16 नोव्हेंबर (नागरी सेवा व शासकीय कागदपत्रे शिबिर): आधार कार्ड दुरुस्ती वनपट्टेधारकांना लाभ वाटप पीकविमा व विविध ई-सेवांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करणे 17 नोव्हेंबर (आरोग्य व पोषण जनजागृती शिबिर): आरोग्य विभागाच्या सहकार्याने सिकलसेल (Sickle Cell) तपासणी रक्तदाब मधुमेह तपासणी तसेच माता-बाल संगोपन व पोषणबागेबाबत मार्गदर्शन करणे 18 नोव्हेंबर (सक्षमीकरण व सप्ताह समारोप): युवक-युवतींसाठी रोजगार मेळावे कौशल्य विकास प्रशिक्षण शिष्यवृत्ती मार्गदर्शन आणि डिजिटल आर्थिक साक्षरता शिबिराचे आयोजन करून सप्ताहाचा समारोप करणे
या बैठकीत सर्व शासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था स्वयंसेवी संस्था आणि लोकप्रतिनिधींनी या सर्व उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले तालुक्यातील सर्व आदिवासी बांधव शेतकरी युवक आणि महिला भगिनींनी या ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताहा’तील शिबिरांचा व शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button