जिल्हा पाचोरा _भडगाव तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांनी स्वतःचा वाढदिवसाचा खर्च टाळत मुख्यमंत्री सहायता निधीत 5 लाख रुपये दिले

भडगाव प्रतिनिधी विजय माळी
यंदा दुष्काळाचे सावट लक्षात घेता आमदार किशोर पाटील यांनी वाढदिवस साजरा न करता पुष्पगुच्छ केक आणि बॅनरवरील खर्च टाळून शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले असता दरवर्षी शिवसेना-युवासेना व स्व.बापुजी युवा फाउंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रम आणि स्पर्धांनी साजरा होणारा वाढदिवस यंदा सामाजिक बांधिलकी जपत वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला. आमदार किशोर पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भडगाव नगर _परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, गटनेते तसेच शिवसेनेच्या सर्व नगरसेवक-नगरसेविकांनी एकत्र येत दोन लाख पन्नास हजार, तर स्व. बापुजी युवा फाउंडेशनच्या वतीने दोन लाख पन्नास हजार, असे एकूण पाच लाखांचे धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी भूषण आहिरे यांच्याकडे सुपूर्द केले यावेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील शिवसेना गटनेते लखीचंद पाटील जहागीर मालचे नगरसेवक जगन भोई, संतोष महाजन आसिम मिर्झा अतुल परदेशी देवा आहिरे जितेंद्र आचारी, राहुल ठाकरे, अलीम शहा सौरभ देशमुख शुभम भोसले शेख वकार प्रशांत सोनवणे आदी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते









