ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी सतीश सिसोदे यांना 10 हजाराची लाच स्वीकारताना ACB विभागाने अटक केली आहे या कार्यवाहीनंतर बँकेची आणि घराची चौकशी केल्यानंतर 5 कोटी पेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल यांच्याकडे भरपूर वर्षापासून चार्ज होता कमिशन दिल्याशिवाय सही करत नव्हते पत्रकार विषयी त्यांच्या मनात नेहमी द्वेष भावना होती इतक्या मोठ्या चोऱ्या करतात शेवटी पत्रकारच यांचे पोस्टमार्टम करतात


जळगाव जिल्हा परिषद बांधकाम विभाग जळगाव 10 हजाराची लाच घेताना सापडले परंतु त्यांना माहीत नव्हतं पुढे काय होणार _ जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्याच ठिकाणी महा घोटाळे सुरू असून यांची चौकशी झालीच पाहिजे जनतेच्या पैशावर डल्ला मारणारे अधिकारी इंजिनिअर यांच्या सुद्धा चौकशा झाल्या पाहिजे एकही काम व्यवस्थित करत नाही फक्त कमीशन घेणे त्यानंतर सही करायची यामागे त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते जळगाव जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी सतीश सिसोदे हे फार वर्षापासून कार्यरत असून यांनी मोठमोठे महागोटाळे केले असून दोन दिवसापूर्वी त्यांनी 10 हजाराची लाच स्वीकारताना ACB विभागाने अटक केली त्यांच्या घराची व बँकेतील लॉकर ची चौकशी केली असता तब्बल 5 कोटी होऊन अधिक किमतीचा मुद्देमाल आढळून आला यामध्ये लाखोंची रोख रक्कम दोन मोठमोठे बंगले सोन्या चांदीचे दागिने चांदीच्या वस्तू प्लॅटिनम च्या दागिन्यांचा समावेश आहे या कार्यवाहीमुळे जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली सतीश मन्सुलाल सिसोदे वय 55 वर्ष स्वामी विवेकानंद सोसायटी आदर्श नगर जळगाव जिल्हा परिषद बांधकाम विभागात वर्ग 1 चे उपविभागीय अधिकारी म्हणून बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहे दिनांक 2 नोव्हेंबर रोजी एसीबी विभागाने त्यांच्याविरुद्ध सापळा रचून कार्यवाही केली याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 ते कलम 7 व 12 या कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने सतीश शिसोदे यांना 5 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सोनाली आहे बँक लॉकर मध्ये कोट्यावधीची मालमत्ता आढळल्याने पगार नसताना एवढे पैसे आले कुठून? या प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून पुढील तपासात काय निष्पन्न होते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही ACB नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक भारत तांगडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली तसेच बँकेतील लॉकर पोलीस उपाधीक्षक योगेश ठाकूर पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्याबरोबर सुरेश पाटील किशोर महाजन संगीता पवार राकेश दुसाने आणि सचिन चाटे या पथकातील पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे सुनील वानखेडे आणि मनोज पाटील यांनी कार्यवाही यशस्वी केली


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button