ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील भडगावच्या मानसी ब्राह्मणकर मुक्ताई सोलाट, श्रद्धा पाटील यांची रोलर स्केटिंगमध्ये भरारी नाशिक विभागीय स्पर्धेतुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड


भडगाव प्रतिनिधी विजय माळी
भडगाव तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी उल्लेखनीय कामगिरी कु. श्रद्धा बापूराव पाटील वय 17 वर्ष गटात प्रथम क्रमांक, कु. मुक्ताई वैभव सोलाट वय 11 वर्ष गटात तृतीय क्रमांक व कु.मानसी निलेश ब्राह्मणकर वय 11 वर्ष गटात तृतीय क्रमांक मिळवला आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 मध्ये श्रद्धा हिने प्रथम क्रमांक, मुक्ताई येणे तृतीय क्रमांक व मानसीने तृतीय क्रमांक पटकावत यश संपादन केले. या यशामुळे त्यांची पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे यात मुक्ताई वैभव सोलाट ही भडगाव येथील तहसिलदार शितल सोलाट यांची कन्या आहे तर मानसी निलेश ब्राम्हणकार ही भडगाव पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे पोलीस काॅन्सटेबल निलेश ब्राम्हणकार यांची कन्या आहे लहान वयातच जिद्द मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर सर्वांनी हे यश मिळविले असून त्यांच्या कामगिरीमुळे क्रीडा क्षेत्रात भडगावचे नाव उज्ज्वल झाले आहे. विभागीय स्तरावरील स्पर्धेत निवड होणे हे त्यांच्यासाठी मेहनतीची आणि क्रीडा कौशल्याची पोचपावती मानली जात आहे तिघांना मार्गदर्शन करणारे अतिक साटोटे, सुनिल मोरे तसेच गजानन स्पोर्ट्स अकॅडमी (पाचोरा व भडगाव) यांच्या योगदानाचेही विशेष कौतुक होत आहे. प्रशिक्षकांच्या मार्ग_ दर्शनासोबत खेळाडूंनी घेतलेली मेहनत आणि सरावातील सातत्य यामुळे त्यांना यश मिळाले आहे श्रद्धा मानसी व मुक्ताई यांच्या यशाबद्दल त्यांचे कुटुंबीय, प्रशिक्षक क्रीडाप्रेमी आणि परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आता राज्यस्तरीय स्पर्धेतही तिघांनी उत्कृष्ट कामगिरी करावी आणि यशाची नवी उंची गाठावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे भडगावच्या या गुणवंत खेळाडूच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळणार आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button