महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या पुणे पोलिसात मोठे फेरबदल राज्य शासनाच्या गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून पुणे शहर आयुक्तालयासह विविध महत्त्वाच्या विभागांमध्ये मोठे फेर बदल करण्यात आलेले आहे

महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या पुणे पोलिसात मोठे फेरबदल राज्य शासनाच्या गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून पुणे शहर आयुक्तालयासह विविध महत्त्वाच्या विभागांमध्ये मोठे फेर बदल करण्यात आलेले आहे या बदल्यामुळे पुणे कोल्हापूर कोकण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची बदली कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था जास्त गुन्हेगारी वाढल्याने गुन्हेगारी नियंत्रणामध्ये यावी यासाठी महत्व पूर्ण बदल करण्यात आले आहे पुणे शहर गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांच्या जागी राज्य राखीव पोलीस बल क्रमांक 1 च्या समादेशक तेजस्वी सातपुते यांची बदली झाली गुन्हे शाखेतील तपास संघटनात्मक कामकाजात सातपुते यांच्या बदलीमुळे नवीन बदल घडून येतील असे पुणेकरांना वाटत आहे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागात बदली करण्यात आली आहे तसेच जिंतूर परभणी येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन देवाशीस बेनीवाल यांची पुणे शहर पोलीस दलात उपायुक्त पदी निवड करण्यात आली आहे अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांची पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या अतिरिक्त अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था गुन्हे तपासाच्या दृष्टिकोनातून त्यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण आहे ठाणे पोलीस आयुक्तालयातील अतिरिक्त आयुक्त एस वी पाठक यांची पुणे येथील राज्य अन्वेषण विभागात बदली करण्यात आली आहे त्यानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागात अधीक्षक पदावर कार्यरत असलेले एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांची पदोन्नती सीआयडी मध्ये उपमा निरीक्षक पदी निवड झाली राज्य शासनाच्या या बदल्यांमुळे विविध पोलीस विभागामध्ये प्रशासकीय कार्यपद्धतीत कायदा व सुव्यवस्था चांगली होईल अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त होत आहे आगामी काळात फायदा होतो व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने या वरील सर्व नियुक्त्या महत्त्वपूर्ण मानल्या जात आहे










