भूमी अभिलेख जळगाव विभाग नियमानुसार लाच स्वीकारली जाईल मागच्या महिन्यातच ACB विभागाने भूमि अभिलेख विभागातील जितेंद्र पाटील या व्यक्तीला ACB विभागाने रंगे हात लाच स्वीकारताना पकडण्यात आले होते त्या अगोदरही अनेक घटना घडल्या भूमी अभिलेख विभागातील अधिकारी लखोपती करोडपती झाले यांची CBI चौकशी करून नार्को टेस्ट करावी नकलांच्या अर्जासाठी लागणारी सरकारी नियमाप्रमाणे फी घेतली पाहिजे शेताची किंवा प्लॉटिंगची मोजणी फेरफार करण्याचे लाखो रुपये रिश्वत म्हणून घेतात

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील भूमी अभिलेख विभागात सरकारी नियमानुसार फी आकारली जात नाही अनेक तक्रारी असून सुद्धा गेंड्याच्या कातडी सारखे पांघरून घेऊन झोपेचे सोंग घेतलेली भूमी अभिलेख विभागातील अधिकारी आणि क्लार्क यांना शेतकऱ्यांविषयी जाणीव कधी होईल भुमी लेख विभागातील नकलेच्या अर्जासाठी लागणारी फी ही सरकारी नियमाप्रमाणे घेतली पाहिजे त्यानंतर वरिष्ठ कार्यालय पुणे नागपूर मुंबई या ठिकाणी प्रत्येक भूमि अभिलेख विभागाचे काय कार्य झाले त्याची माहिती कळवावी लागते पण महत्वपूर्ण मुद्देसूत माहिती वरिष्ठ विभागाला जात नाही भ्रष्टाचाराची माहिती भुमी लेख विभाग कळवत नाही त्यामुळे भ्रष्टाचार भूमी अभिलेख विभागात होतो परस्पर कामे करून दिली जातात अनेक गावातील तालुक्यातील मोजणी त्यानंतर महत्त्वपूर्ण उताऱ्यांमध्ये बदल खाडाखोड मोजमाप आणि उतारे देण्यासाठी 2000 पासून ते लाखो रुपया पर्यंत लाच घेतल्याचे कळते अनेक तक्रारी असून तक्रारदार पुढे येत नाही काही जण येतात काही लोकांचे कामे होत नाही आणि काही लोकांचे काम झालेले असतात भूमि अभिलेख विभागातील अधिकारी इतक्या लवकर इतके मोठे लखोपती करोडपती कसे झाले यांची सीबीआय चौकशी करून नार्को टेस्ट झाली पाहिजे तसा प्रकार आजपर्यंत देशांमध्ये प्रत्येक विभागामध्ये होत नाही कारण वरपासून ते खालच्या लेव्हलपर्यंत भ्रष्टाचार मिळून मिसळून होतो आणि भारतात मुळातच शासक वर्ग लक्ष देत नाही कारण भ्रष्टाचार केलेला पैसा हा वरपर्यंत जात असेल म्हणून त्याची बोंबाबोंब होत नाही तेरी भी चुप मेरी भी चुप आणि हेच खरे देशाचे देशद्रोही शेतकऱ्यांची पिळवणूक शेतकऱ्यांचे रक्त शोषण करणारे हे ढेकूण कधी संपणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली होती प्रलंबित प्रकरणे पंधरा दिवसात निकाली काढू त्यानंतर 9 दिवसात उताऱ्याची नोंद करून उतारा हातात देऊ मात्र प्रत्यक्षात काही प्रकरणे अजून सुद्धा प्रलंबित असून त्यांचा निकाल अजून पर्यंत लागलेला नाही टेबलाखालून पैसे दिले तर लगेच तुमचे काम तत्काळ होईल असा कारभार सगळ्याच विभागामध्ये होत आहे भारत देशाविषयी देशप्रेम राहिलेलं नाही पक्ष प्रेम जास्त वाढल्याने देशामध्ये बेरोजगारी भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव नाही फक्त आणि फक्त भारत देशाला लुटण्याचे कार्यक्रम सुरू झाले आहे









