जिल्हा जळगाव तालुका भडगाव _ दुष्काळ निवारण व शासकीय सेवा-सुविधा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची : प्रशांत पवार यांचे आवाहन जे पत्रकार नेहमी न्यूज टाकण्यासाठी तत्पर असतात त्यांचा विचार झाला पाहिजे ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी दुसरे कार्य करावे

भडगाव प्रतिनिधी विजय माळी
दिपावलीच्या पावन पर्वावर भडगाव शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांशी स्नेहसंवाद साधत दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष तथा विविध संस्थांचे पदाधिकारी श्री. प्रशांत दत्तात्रय पवार यांनी सद्यस्थितीतील दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेत पत्रकारांशी सविस्तर हितगुज साधले यावेळी बोलताना श्री. प्रशांत पवार यांनी सांगितले की तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि सर्वसामान्य जनता शेतकरी व कष्टकऱ्यांना आवश्यक त्या शासकीय सेवा-सुविधा मिळवून देण्यासाठी प्रशासनासोबतच प्रसारमाध्यमांचे सहकार्य मोलाचे ठरणार आहे. दुष्काळाच्या तीव्र झळा कमी व्हाव्यात म्हणून शासनाच्या योजना पाणीपुरवठा व इतर मदत उपाययोजनांची माहिती पत्रकारांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत वेळेवर पोहोचणे गरजेचे आहे यासाठी सर्व पत्रकार बांधवांनी विशेष मार्गदर्शन व जनजागृतीपर संदेश तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले याप्रसंगी आबासो. दत्तात्रय माणिकराव पवार व श्री. प्रशांत पवार श्री. प्रविण दत्तात्रय पवार यांच्यासह पवार परिवारातर्फे सुत्रसंचालन करतांना पत्रकार संजय पवार यांनी तालुक्यातील नागरिकांना व पत्रकारांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या तसेच दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर “पाण्याचे करा संवर्धन समृद्ध होईल आपले जीवन” व “पाण्याचे कराल संरक्षण… वसुंधरेचे होईल रक्षण.. हा जलसंधारणाचा संदेशही देण्यात आला













