ताज्या बातम्या

जळगाव शहरातील मेहरूण स्मशानभूमीचा चेहरामोहरा बदलणार; महापौरांनी दिली प्रत्यक्ष भेट रस्ता बंद करून गेट बसवण्याचे आदेश स्मशानभूमीची आणि मेहरूण तलावाची सुद्धा दुरुस्ती करण्यात येईल त्यासाठी पर्यायी रस्ते नवीन तयार करण्यात येतील महापौर दीपमाला काळे


जळगाव: मेहरूण परिसरातील छत्रपती शिवाजी उद्यानाजवळ असलेल्या स्मशानभूमीच्या दुरवस्थेबाबत आजी-माजी नगरसेवकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत, महापौर दीपमाला काळे यांनी सोमवारी (२० एप्रिल) सकाळी १० वाजेला स्मशानभूमीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी स्मशानभूमीच्या स्वच्छतेबाबत आणि सुरक्षेबाबत कडक सूचना देत विविध विकासकामांचे आदेश दिले.प्रत्यक्ष पाहणी आणि तक्रारींचे निवारण स्मशानभूमीत कचऱ्याचे साम्राज्य असून झाडलोट करण्यासाठी कर्मचारी येत नसल्याच्या तक्रारी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केल्या होत्या.तसेच स्मशानभूमीच्या परिसरातून होणारी वाहतूक थांबवण्यासाठी दोन्ही बाजूंनी संरक्षक गेट बसवण्याची मागणी करण्यात आली होती. महापौरांनी या सर्व बाबींची पाहणी करून, नागरिकांना स्मशानभूमीतून जाण्याऐवजी पर्यायी रस्त्याचा वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत.उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, स्थायी समिती सदस्य गणेश सोनवणे, स्थानिक नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, रितिक ढेकळे, सामाजिक कार्यकर्ते आशुतोष पाटील, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी उपस्थित होते.महापौर दालनात बैठक: प्रशासनाला दिले ‘हे’ आदेश सकाळी केलेल्या पाहणीनंतर, दुपारी ४ वाजता महापौर दालनात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत महापौरांनी महत्त्वाचे निर्णय घेतले.तातडीने स्वच्छता: स्मशानभूमी परिसरातील कचरा हटवून तातडीने साफसफाई व दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे आदेश महापालिकेच्या यंत्रणेला दिले.संरक्षक गेट: स्मशानभूमीच्या दोन्ही दिशांना गेट लावून सामान्य वाहतुकीसाठी हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. नागरिकांना पर्यायी रस्त्याबाबत फलक लावून सूचना दिल्या जातील.सौंदर्यकरणाला वेग: मेहरूण परिसरातील सौंदर्यकरणाचे काम ज्या विकासकांना देण्यात आले आहे, त्यांनी ते काम विनाविलंब आणि तातडीने पूर्ण करावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.या निर्णयामुळे मेहरूण परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांची प्रलंबित मागणी मार्गी लागली असून, स्मशानभूमीच्या स्वच्छतेचा प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button