ताज्या बातम्या

जळगाव महानगरपालिकेची पावसाळ्यापूर्वी प्रभाग 15 मधील मोठ्या ‘बाबा खोली’ नाल्याची स्वच्छता महापौरांच्या सूचनेनंतर आरोग्य विभागाची धडक मोहीम स्वच्छतेचे काम गुरु असताना स्वतः महापौर दीपमाला काळे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली


जळगाव (प्रतिनिधी) : पावसाळा तोंडावर आलेला असताना शहरात ठिकठिकाणी नालेसफाईच्या कामांना वेग आला आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील अत्यंत अडचणीच्या मानल्या जाणाऱ्या ‘बाबा खोली’ परिसरातील नाल्याची रविवारी (24 मे) आरोग्य विभागातर्फे विशेष मोहीम राबवून स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत सुमारे तीन ट्रॅक्टर इतका गाळ काढण्यात आला असून, नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.नागरिकांच्या तक्रारीनंतर महापौरांचे आदेश प्रभाग क्रमांक १५ मधील बाबा खोली नावाच्या नाल्याच्या दोन्ही बाजूंना दाट लोकवस्ती आणि घरे आहेत. त्यामुळे या नाल्याची साफसफाई करण्यासाठी अजिबात जागा शिल्लक नव्हती. पावसाळ्यात हा नाला तुंबून घरात पाणी शिरण्याची भीती असल्याने, स्थानिक नागरिकांनी महापौर दीपमाला काळे यांच्याकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या. नागरिकांच्या समस्येची दखल घेत महापौरांनी तातडीने आरोग्य विभागाला या नाल्याची साफसफाई करण्याचे आदेश दिले होते. 6 तास चालली मोहीम; 1 किमी अंतराचा गाळ काढला महापौरांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागाने रविवारी सकाळी 7 वाजेपासूनच या परिसरात धडक मोहीम हाती घेतली. अत्यंत बिकट परिस्थिती आणि जागेची अडचण असतानाही, दुपारी 1 वाजेपर्यंत तब्बल 6 तास सलग काम करण्यात आले. या मोहिमेत सुमारे 1 किलोमीटर लांबीच्या या मोठ्या गटारीमधील साचलेला संपूर्ण गाळ आणि कचरा उपसण्यात आला. या कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.या मोहिमेदरम्यान आरोग्य विभागाचे सहाय्यक उपायुक्त उदय पाटील, समीर बोरोले, स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, रुपेश भालेराव, मंजू पवार यांच्यासह बीव्हीजी (BVG) कंपनीचे ठेकेदार आणि स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महापौरांकडून कामाची पाहणी स्वच्छतेचे हे काम सुरू असताना स्वतः महापौर दीपमाला काळे यांनी बाबा खोली परिसरात भेट देऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेबाबत योग्य त्या सूचना दिल्या. या मोहिमेत तब्बल तीन ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला असून, पावसाळ्यापूर्वी नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून काही दिवसांनी पुन्हा एकदा या नाल्याची साफसफाई केली जाईल, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button