ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव भुसावल अनिल चौधरी राजकीय बेरोजगार; निवडणुकीच्या तोंडावर वातावरण तापविण्याचा प्रयत्न मतदार पुनरीक्षण प्रक्रियेवरून भाजपचा पलटवार; युवराज लोणारी यांचा चौधरींवर घणाघात


भुसावळ प्रतिनिधी गोपी अण्णा भुसावळ शहरातील राजकीय वातावरण बिघडविण्याचे काम अनिल चौधरी करीत असून, विधानसभा आणि विधानपरिषद निवडणुकांच्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करून मलिदा खाण्याच्या उद्देशाने निवडणूक लढवित होते त्यांना यापूर्वी रावेर-यावल विधानसभा एरंडोल आणि नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत मतदारांनी घरचा रस्ता दाखवलेला आहे. राजकीय बेरोजगार झाल्याने शिंदे गटात जाऊन ते स्वतःचे राजकीय अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा जोरदार आरोप भाजपचे नगरपरिषदेतील गटनेते युवराज लोणारी यांनी केला निवडणुकीच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळविण्याच्या उद्देशाने वारंवार उमेदवारी अर्ज दाखल करून राजकीय हवा निर्माण करण्याचे काम काही राजकीय बेरोजगारांकडून सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे अनिल चौधरी यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देण्यासाठी आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी युवराज लोणारी यांनी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवरून भाजपची भूमिका स्पष्ट करत अनिल चौधरी यांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले मतदार पुनरीक्षण ही निवडणूक आयोगाची प्रक्रिया मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) हा भारतीय जनता पक्षाचा राजकीय उपक्रम नसून भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखाली राबविण्यात येणारी संवैधानिक प्रक्रिया आहे मतदार यादीतील दुबार नावे मृत मतदारांची नावे आणि अन्य अपात्र नोंदी दूर करून मतदार यादी अधिक अचूक व पारदर्शक करणे हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे असे लोणारी यांनी स्पष्ट केले मतदार यादीत बेकायदेशीररीत्या समाविष्ट झालेल्या परदेशी नागरिकांच्या नोंदींचीही नियमानुसार पडताळणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः बांगलादेशी नागरिक आणि रोहिंग्या यांच्यासंदर्भातही नियमांनुसार तपासणी होणे गरजेचे असल्याची भूमिका त्यांनी मांडली प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी प्रक्रियेत सहभागी एसआयआर प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार राजकीय पक्षांचे बूथस्तरीय प्रतिनिधी (बीएलए-2) नियुक्त केलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना तसेच बूथस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. मतदार यादीच्या शुद्धीकरण प्रक्रियेत राजकीय पक्षांनी जबाबदारीने सहभागी व्हावे असे आवाहनही भाजपच्या वतीने करण्यात आले भुसावळ शहरातील मतदार सुज्ञ आणि सुशिक्षित आहेत त्यामुळे अनिल चौधरी यांच्यासारख्या व्यक्तींनी केलेल्या आरोपांना मतदारांकडून कोणतेही महत्त्व दिले जात नाही असा टोला लगावत युवराज लोणारी यांनी चौधरी यांच्यावर जोरदार टीका केली पात्र मतदारांचे नाव वगळले जाणार नाही मतदार यादीच्या पुनरीक्षण प्रक्रियेत एकाही पात्र मतदाराचे नाव वगळले जाऊ नये यासाठी भाजप पूर्णपणे सहकार्य करणार आहे कोणत्याही पात्र नागरिकावर अन्याय होऊ नये ही पक्षाची भूमिका आहे. त्याचवेळी दुबार नावे मृत मतदारांच्या नोंदी आणि अपात्र नावे यांची योग्य पडताळणी होऊन मतदार यादीचे शुद्धीकरण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे असे लोणारी यांनी सांगितले नमुना क्रमांक 7 द्वारे आक्षेप घेण्याचा अधिकार मतदार यादीतील एखाद्या नोंदीबाबत आक्षेप असल्यास नमुना क्रमांक 7 भरून नियमानुसार हरकत नोंदविण्याचा अधिकार संबंधितांना आहे कोणत्याही मतदाराच्या नोंदीबाबत आक्षेप घेणे हा संवैधानिक प्रक्रियेचा भाग आहे मात्र अशा प्रकारे आक्षेप नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांना कोणी धमकावण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते सहन केले जाणार नाही संबंधितां विरोधात पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशाराही युवराज लोणारी यांनी दिला चौधरी कुटुंबातील दुबार मतदार नोंदींचा मुद्दा उपस्थित पत्रकार परिषदेत मतदार यादीतील कथित दुबार नोंदींचा मुद्दाही भाजपकडून उपस्थित करण्यात आला भाग क्रमांक 63 मधील संतोष छबिलदास चौधरी आणि रेखा संतोष चौधरी यांच्या नावांसंदर्भात दुबार नोंदी असल्याचा दावा करण्यात आला. रेखा संतोष चौधरी यांचे नाव मतदार यादीत 420 क्रमांकावर असल्याचे सांगत या नोंदींची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली मतदार यादीतील अशा नोंदींची अधिकृत पडताळणी करून नियमानुसार योग्य ती कार्यवाही व्हावी अशी भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली मात्र संबंधित नोंदी खरोखरच दुबार आहेत किंवा त्यामागे बेकायदेशीर कृती झाली आहे का याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अधिकृत पडताळणी होणे आवश्यक आहे पत्रकार परिषदेला भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या पत्रकार परिषदेला भुसावळ नगरपरिषदेचे गटनेते युवराज लोणारी, प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, नगरसेवक राजेंद्र आवटे, महेंद्रसिंग ठाकूर, निर्मल कोठारी, किरण कोलते, निक्की संत्रा, संजयकुमार नाहटा, अल्बर्ट तायडे, विशाल नाटकर सविता मकासरे सुजित भोळे कैलास पाटील आणि पुरुषोत्तम नारखेडे उपस्थित होते एकूणच अनिल चौधरी यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपने घेतलेल्या पत्रकार परिषदेतून भुसावळमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे मतदार यादी पुनरीक्षणाचा विषय आता केवळ प्रशासकीय प्रक्रियेपुरता मर्यादित न राहता स्थानिक राजकारणातील आरोप-प्रत्यारोपांचा केंद्रबिंदू बनला आहे मात्र या संपूर्ण वादात राजकीय आरोपांपेक्षा पात्र मतदारांचे हक्क अबाधित राखणे आणि मतदार यादीतील त्रुटी दूर करणे यालाच प्राधान्य मिळणे आवश्यक आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button