ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथे भव्य नेत्र_ तपासणी रक्तदान शिबिर व वाहन साक्षरता अभियान 2026 उत्साहात संपन्न नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रस्ता सुरक्षा हेल्मेट वापर आणि वाहन कागदपत्राच्या विषयी जनजागृती सौजन्य: _ दैनिक अतुल्य भारत संस्थापक अध्यक्ष दैनिक अतुल्य भारत


पिंपळगाव हरेश्वर : पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे परिवहन सुरक्षा समिती, मुंबई, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय भडगाव, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन, सत्कर्म युनिव्हर्सल फाउंडेशन पिंपळगाव, कांता लक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय नंदुरबार आणि जीवन ज्योती ब्लड बँक धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर व वाहन साक्षरता अभियान २०२६ आयोजित करण्यात आले. गोविंद महाराज समाधी मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाला गावातील तसेच परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमास परिवहन सुरक्षा समितीचे राज्य अध्यक्ष जितेंद्रसिंग राजपूत, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय भडगावच्या मोटार वाहन निरीक्षक प्रियंका सोनवणे, गोविंद महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्ष शामराव महाजन, सत्कर्म युनिव्हर्सल फाउंडेशनचे सुनील चव्हाण, मंदिर संस्थान संचालक संजय सपकाळ, पंडित तेली, प्रदीप पवार, दैनिक झळकचे संपादक प्रदीप महाले, ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.रस्ता सुरक्षा व हेल्मेट वापराबाबत जनजागृती सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी उपस्थित नागरिकांना रस्ता सुरक्षा, वाहन सुरक्षा आणि हेल्मेट वापराचे महत्त्व समजावून सांगितले. वाहनाचा विमा, आवश्यक कागदपत्रे तसेच पीयूसी जवळ बाळगणे किती आवश्यक आहे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.“वाहन साक्षरता अभियान प्रत्येक गावागावात आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचले पाहिजे. परिवहन सुरक्षा समितीने हा उपक्रम व्यापक स्वरूपात राबवावा,” असे आवाहन कल्याणी वर्मा यांनी केले.वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन मोटार वाहन निरीक्षक प्रियंका सोनवणे यांनी वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. विशेषतः दुचाकी स्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, वाहनाची आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावीत, वाहनाचा परवाना, विमा व पीयूसी अद्ययावत ठेवावे, असे त्यांनी स्पष्ट केले.वाहन चालविताना वाहनाची लाईट व्यवस्था तसेच इतर आवश्यक सुरक्षा बाबी तपासणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात पाचोरा, भडगाव, पारोळा आणि अमळनेर परिसरात अशा प्रकारची जनजागृती शिबिरे आयोजित करण्याची गरज असून, प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद कार्यक्रमात नागरिकांना डोळ्यांची नियमित तपासणी, डोळ्यांची काळजी आणि वेळोवेळी नेत्र तपासणी करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. कांता लक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय, नंदुरबार यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिराचा गावातील तसेच परिसरातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला.
रक्तदान शिबिरातून सामाजिक बांधिलकी कार्यक्रमाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. जीवन ज्योती ब्लड बँक, धुळे यांच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमातून रक्तदानाचे महत्त्व आणि गरजू रुग्णांसाठी रक्ताची आवश्यकता याबाबत जनजागृती करण्यात आली.पुढील काळातही अभियान सुरू राहणार कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरटीओ वाहनचालक शिवाजी मराठे, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे किरण ब्राह्मणे, दीपक अहिरे, योगेश वराडे, तसेच रमेश पाटील, प्रसाद साखरे आणि गोविंद महाराज मंदिर संस्थान यांचे सहकार्य लाभले.यापुढेही उपप्रादेशिक परिवहन कार्यालय भडगावच्या कार्यक्षेत्रातील पाचोरा, भडगाव, पारोळा आणि अमळनेर येथे वाहन साक्षरता, हेल्मेट जनजागृती, नेत्र तपासणी व सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.परिवहन सुरक्षा समितीचे अध्यक्ष जितेंद्रसिंग राजपूत यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थित नागरिक तसेच पोलीस आणि परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी कौतुक केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button