ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव भडगाव तालुक्यातील राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश टाक, उपनिरीक्षक सुशीलकुमार,सरपंच सरला सोनवणे यांच्या हस्ते


भडगाव (प्रतिनिधी) Vijay Mali
राष्ट्रीय चर्मकार महासंघ, भडगाव शहर व तालुका यांच्या वतीने महासंघाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ संपन्न झाला.या कार्यक्रमात दहावी, बारावी, पदवी, पदविका, आयटीआय, नीट, सीईटी, एमपीएससी, यूपीएससी, मेडिकल तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे, शासकीय सेवेत निवड झालेले तसेच आर्मी, नेव्ही व मिलिटरी फोर्सेसमध्ये रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे यश हे केवळ त्यांच्या कुटुंबाचा नव्हे, तर संपूर्ण समाजाचा अभिमान आहे. शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे सर्वात प्रभावी साधन असून विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने म `हनत घ्यावी. आज ज्यांचा सत्कार होत आहे, त्यांनी भविष्यात ाजातील इतर विद्यार्थ्यांसाठी आपल्या सम बनावे. प्रेरणास्थान यावेळी पांडुरंग बाविस्कर, ईश्वरलाल अहिरे, पोलिस निरीक्षक महेश टाक, पोलीस उपनिरीक्षक सुशिल कुमार सोनवणे, सरपंच सरला सोनवणे, उत्तम मोरे, रविंद्र अहिरे, मधुकर वाघ, सुधीर अहिरे, पोलिस पाटील वंदना मोरे, लता अहिरे, सुरेखा वाघ, संजय पवार, पत्रकार सागर महाजन, निलेश महाले, डॉ. बी. बी. भोसले, नितीन महाजन, ज्ञानेश्वर मोरे यांच्या हस्ते संजय शेवाळे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोमेश्वर आहिरे, सुमित अहिरे, रावसाहेब अहिरे, नरेश बोरसे, आनंदा अहिरे, बिन्हाडे आप्पा, एकनाथ अहिरे, मोहित अहिरे, हेमंत अहिरे, बापू अहिरे, प्रकाश तायडे व समाज बांधवांची उपस्थिती होती.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button