ताज्या बातम्या

भडगाव तालुक्यातील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रदूषण मुक्त दिवाळीचा निर्धार फटाक्यांऐवजी आरोग्याचा प्रकाश! सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा ‘प्रदूषणमुक्त दिवाळी’चा निर्धार,शालेय परिपाठात शेकडो विद्यार्थ्यांनी घेतली पर्यावरण रक्षणाची सामूहिक शपथ.


भडगाव प्रतिनिधी विजय माळी
स्थानिक सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालयात आज दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सकाळच्या शालेय परिपाठादरम्यान विद्यार्थ्यांना ‘प्रदूषणमुक्त दीपावली’ची सामूहिक शपथ देण्यात आली. सण-उत्सव साजरे करताना पर्यावरणाचे संवर्धन व्हावे आणि मानवासह सर्व सजीव सृष्टीचे रक्षण व्हावे, या उद्देशाने विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा दृढ संकल्प केला कार्यक्रमादरम्यान विद्यालयाचे उपशिक्षक श्री. श्रद्धेश तळेगावकर यांनी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना ही शपथ वदवून घेतली. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मोठ्या प्रमाणावर हवा व ध्वनी प्रदूषण निर्माण होते, जे मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरते. या प्रदूषणाचा सर्वाधिक विपरीत परिणाम लहान मुले, वृद्ध नागरिक, आजारी रुग्ण तसेच निष्पाप पशुपक्ष्यांवर होतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः फटाके न वाजवता आपल्या कुटुंबीयांना नातेवाईकांना व परिसरातील नागरिकांनाही पर्यावरण रक्षणाबाबत जागरूक करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पुस्तकी ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात वापर करून विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून सामाजिक उत्तरदायित्वाचा एक आदर्श संदेश दिला.या उपक्रमाप्रसंगी संस्थेचे व शाळेचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. अजय अहिरे, उपमुख्याध्यापिका श्रीमती छाया व्ही. बिऱ्हाडे, उपप्राचार्य श्री. संदीप सोनवणे, पर्यवेक्षक श्री. अशोक तायडे, पर्यवेक्षक श्री. शरद महाजन, श्री. नितीन सोनजे, श्री. डी. पी. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button