ताज्या बातम्या

पर्यावरणपूरक उत्सवाची सांगता; मानाच्या गणपतीला भावपूर्ण निरोप वरणगाव, ता. भुसावळ :परंपरा, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वरणगाव येथील तिरंगा सर्कलस्थित मानाचा गणपती मंडळाच्या गणेशोत्सवाची आज दि. 18 रोजी भावपूर्ण वातावरणात सांगता झाली. पाच दिवसांच्या मुक्कामानंतर मानाच्या गणपतीचे विधिवत विसर्जन करण्यात आले.


पर्यावरणपूरक उत्सवाची सांगता; मानाच्या गणपतीला भावपूर्ण निरोप भुसावल प्रतिनिधी गोपी अण्णा मंडळाचे हे प्रथम वर्ष असून, यंदा पर्यावरणपूरक पाच फुटांच्या गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली होती. उत्सवादरम्यान कर्कश ध्वनीला फाटा देत कमी आवाजाच्या साउंड सिस्टीमचा वापर करण्यात आला. तसेच ऑर्केस्ट्रामध्ये बॉलिवूड, लावणी अथवा वेस्टर्न डान्सला स्थान न देता संस्कारशील व पारंपरिक स्वरूपाला प्राधान्य देण्यात आले.पाच दिवस विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी उत्सवाला रंगत आली. महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण संवर्धन, सामाजिक सलोखा आणि साधेपणातून गणेशोत्सव साजरा करण्याचा मंडळाचा प्रयत्न यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरले.आज गणरायाच्या विसर्जनावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.गणेशोत्सवासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदार, महाप्रसाद दान करणारे भाविक व नागरिकांचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मनःपूर्वक आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे राजेश चौधरी , महेश सोनवणे , गजानन वंजारी , भैया देशमुख , बबलू माळी , राजू खडसे , किरण कोलते , जावेद भाई , अशोक शर्मा , रवि तोताणी , रवि पाटील , आरीफ भाई , नाना चौधरी , संजय निंबाळकर , गणेश माळी , विकास कोळी , विजु कोळी , महेंद्र पाटील , विलास मुळे , सुभाष चौधरी , दिलीप चौधरी , बाळू चौधरी , अशोक काळे , प्रशांत ठाकुर , राम बळगुर , अरुण माळी , मुकुंदा सुरवाडे आदीन गणपती विसर्जन मंडळासाठी परिश्रम घेतले .


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button