ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका भडगाव येथील चेक बाऊन्स प्रकरणी रेल्वे कर्मचाऱ्याला 6 महिने कारावास; 2 लाख 20 हजार भरपाई अतिशय योग्य पद्धतीने निकाल दिला असेच निकाल अपेक्षित परंतु देशांमध्ये मोठमोठे अब्जो रुपयांचे घोटाळे करून विदेशात पळाले त्यांचे काय? असा प्रश्न जनता विचारत आहे कारण तो पैसा जनतेच्या कष्टाचा आहे सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे न्याय देताना जातींचे वर्गीकरण नको?


भडगाव (प्रतिनिधी) विजय माळी
हात उसने घेतलेले पैसे परत न करता दिलेला धनादेश बाऊन्स झाल्याप्रकरणी भडगाव न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. पराक्रम्य संलेख अधिनियम कलम 138 अन्वये दाखल खटल्यात रेल्वे कर्मचारी आरोपी विशाल पगारे याला दोषी ठरवत 6 महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा तसेच 2 लाख 20 हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश न्यायमूर्ती राजळे यांनी दिले. महिंदळे, ता. भडगाव, जि. जळगाव येथील रहिवासी मधुकर राजाराम खैरनार यांच्याकडून आरोपी विशाल शिवाजी पगारे, रा. मेगा सिटी, भडगाव, याने घर घेण्यासाठी 1 लाख 70 हजार रुपये हातउसने घेतले होते. ही रक्कम परत करण्यासाठी आरोपीने दिलेला धनादेश बँकेत वटला नाही. पैसे परत न मिळाल्याने मधुकर खैरनार यांनी अॅड. भरत रमेश ठाकरे यांच्यामार्फत भडगाव न्यायालयात एस.एस.सी. 80/2021 हा खटला दाखल केला होता. या प्रकरणातील पुरावे व कागदपत्रांची पडताळणी तसेच अॅड. भरत ठाकरे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 255 (2) अन्वये दोषी ठरवले. न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपी विशाल पगारे याला 6 महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच धनादेशाची मूळ रक्कम 1 लाख 70 हजार रुपये आणि नुकसानभरपाई म्हणून 50 हजार रुपये, अशी एकूण 2 लाख 20 हजार रुपये रक्कम आदेशाच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत फिर्यादीस देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही रक्कम निर्धारित मुदतीत न दिल्यास आरोपीला आणखी दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. या खटल्यात फिर्यादी मधुकर खैरनार यांच्या बाजूने अॅड. भरत रमेश ठाकरे यांनी कामकाज पाहिले.

{“AIGC”:{“ContentPropagator”:”001191441900557262083U10400″,”Label”:”1″,”ReservedCode1″:””,”ProduceID”:”70357843-d737-49e2-9ae6-b660e22a1b70″,”ReservedCode2″:””,”PropagateID”:”70357843-d737-49e2-9ae6-b660e22a1b70″,”ContentProducer”:”001191441900557262083U10400″}};

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button