जिल्हा जळगाव ता; पाचोरा येथील जेष्ठ पत्रकार सुरेश तांबे यांची पाचोरा शहरातील विवेक वर्धिनी या पतसंस्थेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या

पाचोरा येथील जेष्ठ पत्रकार सुरेश तांबे यांची शहरातील विवेक वधिॅनी या पतसंस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या पत्रकार सुरेश तांबे हे जवळपास पस्तीस वर्षांपासून पासुन पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत आपल्या लेखनातून त्यांनी समाजातील घटकांना न्याय दिला आहे, पत्रकारिता करताना त्यांनी त्याच माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा म्हणून पस्तीस वर्षांपासून सायकलीवरून वृत्तपत्र घरपोच देण्याची सेवाही ते आजही उन,वारा, पाऊस काहीही असो ते सकाळी चार वाजेपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत ते वृत्तपत्र संपूर्ण पाचोरा शहरात पोहोचवीत असतात.पाचोरा शहरातील विवेक वधिॅनी पतसंस्थेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने, पाचोरा तालुका अध्यक्ष निलेश पाटील, पत्रकार छोटु सोनवणे, शहर अध्यक्ष अनवर शेख, पत्रकार कुंदन बेलदार. सुरेश तांबे यांना शाल पुष्पगुच्छ,लेखनीची ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.जेष्ठ पत्रकार सुरेश जी तांबे लवकरच जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित होणार= प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा 63 वर्ष हाडाचे पत्रकार सुरेश तांबे हे गेल्या 35 वर्ष पासुन पत्रकारिता क्षेत्रात सायकलीवर वृत्तपत्र आजही ते या वयात सेवा बजावत आहेत म्हणून पत्रकारितेचा सन्मान करणे हे आमचे कामच आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने जेष्ठ पत्रकार सुरेश तांबे यांना गौरविण्यात येईल.असे किशोर रायसाकडा यांनी यावेळी सांगितले विवेक वधिॅनी पतसंस्थेचे चेअरमन,व संचालकाचे आभार मानले.तांबे याचे सर्व क्षेत्रातील मित्र परिवार तर्फे अभिनंदन होत आहे.









