ताज्या बातम्या

जळगावच्या महापौर दीपमाला काळेंनी सोडले सरकारी वाहन; ई-बाईकवर गाठली महापालिका..!जळगाव महापालिकेत दर बुधवारी ‘नो-व्हेइकल डे’ पाळणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केल्यानंतर आता जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी या आवाहनाला कृतिशील प्रतिसाद देत शहरासमोर एक नवा आदर्श ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापौरांनी थेट सरकारी वाहनाचा त्याग केला असून, दर बुधवारी महापालिकेत आता ‘नो-व्हेइकल डे’ पाळला जाणार आहे.महापौर दीपमाला काळे यांनी स्वतःपासून बदलाची सुरुवात केली आहे. जोपर्यंत इंधनाची परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत त्यांनी महापालिकेचे अधिकृत शासकीय वाहन न वापरण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. दर बुधवारी त्या केवळ इलेक्ट्रिक व्हेइकलचा वापर करणार आहेत. यासोबतच त्यांनी महापालिकेतील कर्मचाऱ्यांनाही महत्त्वाचे आवाहन केले आहे. कर्मचाऱ्यांनीही एकट्याने गाडी न आणता ‘व्हेइकल शेअरिंग’ करावे किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दर बुधवारी कर्मचाऱ्यांनी खाजगी वाहनांचा वापर करू नये, असा आग्रह महापौरांनी धरला आहे.या उपक्रमांतर्गत केवळ लोकप्रतिनिधीच नाही, तर संपूर्ण प्रशासकीय स्तरावर इंधन बचतीचे नियोजन करण्यात आले आहे. बाहेरगावच्या बैठकांसाठी शासकीय वाहनाऐवजी रेल्वे प्रवासावर भर दिला जाणार आहे. कर्मचाऱ्यांमध्ये सायकल संस्कृती रुजवण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी हा ‘नो-व्हेइकल डे’ प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button