ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका भडगाव माळी पंच मंडळ अध्यक्ष पदी मनोज महाजन, सचिव पदी डॉ. प्रकाश बच्छाव याची बिनविरोध निवड, संत सावता माळी महाराज पुण्यतिथी निमित्ताने प्रतिमा मिरवणूक, गुणगौरव व महाप्रसाद सोहळा.


भडगाव (प्रतिनिधी) विजय माळी
संत सावता माळी महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या नियोजनासाठी भडगाव शहर माळी पंच मंडळाची बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक तथा महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष साहेबराव महाजन होते. संस्थेचे सचिव विनोद महाजन व माळी पंच मंडळाचे माजी अध्यक्ष मुकुंदा महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.बैठकीत माळी पंच मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी मनोज महाजन, सचिवपदी डॉ. प्रकाश बच्छाव, उपाध्यक्षपदी शुभम शालिग्राम महाजन यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून गोकुळ पांडुरंग महाजन, रितेश प्रकाश महाजन, शिवदास कौतिक महाजन मयुर विनोद महाजन, सुनील आत्माराम महाजन व मनोज उत्तम महाजन यांची निवड करण्यात आली यावेळी येत्या 11 ऑगस्ट (मंगळवार) रोजी संत सावता माळी महाराज पुण्यतिथीनिमित्त सकाळी 8 वाजता बाजार चौक येथील माळी पंच मंडळ कार्यालयातून प्रतिमापूजन व भव्य मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दुपारी ११ वाजता कै. लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालय येथे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.बैठकीस अनिल महाजन, गोविंद महाजन, पत्रकार नितीन महाजन, सागर महाजन, बबलू महाजन, प्रकाश महाजन यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button