जि; जळगाव ता; पाचोरा पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकांची कौतुकास्पद कार्यवाही (खूनी डाकू भ्रष्टाचारी कितने दिन गुमशुदा होता है मगर एक दिन पुलिस के हाथ में लग जाता है)

.
पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांनी आपल्या कौशल्याचा वापर करून, २४ एप्रिल रोजी पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील दोन मुख्य आरोपी, आकाश ठाकरे आणि समाधान ठाकरे यांना अखेर अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आरोपींच्या अटकेमुळे तपासाला गती मिळेल अशी आशा आहे.पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.पीडित तरुणावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याला पुढील शस्त्रक्रियेची गरज असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. आरोपी फरार झाल्याने कुटुंबीय भीतीच्या छायेत जगत होते.तपास अधिकारी, उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांनी शोधमोहीम तीव्र करून फरार असलेल्या दोन आरोपींना अटक केली. या कारवाईबद्दल परिसरात विठ्ठल पवार यांचे कौतुक होत आहे.









