भडगाव संमिश्र न्यूज, जिल्हा जळगाव भडगाव तालुक्यातील देविदास चौधरी यांचे दुःखद निधन; मुलीने दिला मुखाग्नी////////////// भडगाव शहरात प्रथमच सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया विधी संपन्न

भडगाव :(प्रतिनिधी ) विजय माळी
भडगाव येथील यशवंत नगर परिसरातील रहिवासी देविदास सुखदेव चौधरी (वय 45) यांचे रविवार, दि. 6 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 6.30 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते श्री. प्रकाश सुखदेव चौधरी यांचे लहान बंधू होते.
देविदास चौधरी यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, मित्रपरिवार तसेच समाजबांधवांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेत अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व भाऊ असा परिवार आहे.दरम्यान, त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या मुलीने ऋतुजा वडिलांना मुखाग्नी देत अंत्यविधी पार पाडला. मुलीच्या हातून वडिलांना मुखाग्नी देण्याची ही बाब उपस्थितांसाठी भावनिक आणि विशेष ठरली. यावेळी उपस्थित नातेवाईक व समाज बांधवांचे डोळे पाणावले.देविदास चौधरी यांची अंत्ययात्रा रविवार, दि. 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता यशवंत नगर येथील राहत्या घरापासून निघून अमरधाम, भडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत///////////////////////
भडगाव शहरात प्रथमच सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया विधी संपन्न या विधीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोणताही भट-भिक्षुक, कोणतेही अवास्तव मंत्र-तंत्र, किंबा कर्जबाजारी करणारा खर्च नव्हता. भगवान रोकडे यांनी आपल्या प्रभावी व्याख्यानातून उपस्थितांना सार्वजनिक सत्यधर्माचा अर्थ समजावून सांगितला. शरीर नश्बर आहे, विचार अमर आहेत. मृत्यूनंतर कोणतेही पाप-पुण्य, स्वर्ग-नरक नसते. माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे हाच खरा धर्म आहे, हा महात्मा फुले यांचा विचार त्यांनी मांडला सत्यशोधक समाज रजि. नं. एफ/26931 संघ यशोधक समाज
दशक्रिया म्हणजे दुःखी परिवाराला धीरे देणे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हीच खरी श्रद्धांजली असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी निसर्गविलीन योगेश महाजन यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराच्या वतीने सत्यशोधक समाज संचास रु. 600 सहकायां निधी देण्यात आला. हा निधी समाजातील शैक्षणिक आणि प्रबोधनात्मक कार्यासाठी वापरला जाणार आहे.हा ऐतिहासिक सत्यशोधक विधी घडवून आणण्यासाठी सत्यशोधक समाज जिल्हा अध्यक्ष पी डी पाटील, कार्याध्यक्ष कैलास जाधव, भडगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोरख रघुनाथ माळी, चाळीसगाव येथील डॉ. विजय महाजन यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी महाजन कुटुंबीयांचे समुपदेशन करून त्यांना सत्यशोधक विचार पटवून दिला आणि या विधीला संमती मिळवून दिली.भडगाव : मंगळवार दि. 01/09/ 2026 भडगाव शहराच्या सामाजिक आणि वैचारिक चळवळीत एक ऐतिहासिक पाऊल पडले आहे. निसर्गविलीन योगेश शिवाजी महाजन, वय 44 वर्षे, रा. खोलगल्ली,भडगाव यांचे दि. 28/08/2026 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम मंगळवार दि. 01/09/2026 रोजी त्यांच्या राहत्या घरी अत्यंत साध्या, शांत आणि वैचारिक वातावरणात सार्वजनिक सत्यधर्म पद्धतीनुसार पार पडला. हा विधी चाळीसगाव पातोंडा येथील सत्यशोधक विधीकर्ते भगवान शामराव रोकडे यांच्या हस्ते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.भडगाव शहरात अशा प्रकारचा सत्यशोधक दशक्रिया विधी होण्याची ही पहिलीच बेळ असल्याने या घटनेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. निसर्गविलीन योगेश महाजन यांच्या पश्चात पत्नी, 6 वर्षाचा चिमुकला मुलगा आणि 14 वर्षाची मुलगी असा छोटा परिवार आहे. अशा नाजुक परिस्थितीतही या कुटुंबाने कोणत्याही कर्मकांडाला, अंधश्रद्धेला बळी न पडता, महात्मा जोतिराव फुले यांनी दाखवलेल्या सत्यशोधक मार्गाचा अवलंब करण्याचा धाडसी निर्णय मेतला. याबद्दल संपूर्ण सत्यशोधक समाज संघाने या परिवाराचे विशेष कौतुक केले आहे.यांच्या या प्रयत्नांमुळे भडगाव शहरात सत्यशोधक चळवळीला एक नवी दिशा आणि बळ मिळाले आहे. या विधीप्रसंगी खोल गल्ली परिसरातील नागरिक, नातेवाईक, तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









