ताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यासह अवैध धंदे बोकाळले त्याचबरोबर सट्टा पत्ता मटका फक्त बंद होण्याचे आश्वासन कागदावरच कार्यवाही शून्य यामुळे सामान्य जनतेचे नुकसान होत असताना देखील कायदा सुव्यवस्था राबवणारे जाणून-बुजून दुर्लक्ष करीत आहे परिसरात जोरदार चर्चा सट्टा मटका जुगार चालवणाऱ्यांना कोणाचा आशीर्वाद ?


पाचोरा शहरासह परिसरात विविध अवैध धंद्यांना ऊत आला असून अवैध धंद्यांना उधाण आले आहे रस्त्यावर शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये खुलेआम अवैध धंदे दिसून येत असल्याचे चित्र दिसत आहे यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे अवैध धंद्यामुळे शांतता व सामाजिक वातावरण यांच्यावर मोठा परिणाम होत असून अनेक ठिकाणी चोऱ्यांचे प्रमाण वाढले घरपोडींचे प्रमाण वाढले संबंधित यंत्रणेने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून जनतेची सुद्धा मागणी होत आहे महत्त्वाचे कारण म्हणजे अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आतापर्यंत नेहमीच येत असून सुद्धा अवैध धंदे बंद होण्याचे नाव घेत नाही याचे कारण काय यांना कोणाचा आशीर्वाद? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे पोलीस प्रशासन कठोर भूमिका कधी घेणार सट्टा पत्ता मटका (बुगी) किंग यांच्यावर कार्यवाही कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे कोणतेही अधिकारी येऊन हे धंदे बंद का होत नाही याचे कारण काय? अशी चर्चा जनतेमध्ये सुरू आहे सट्टा पत्ता मटका या अवैध धंद्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असून अनेकांच्या शेती विकली गेली काहींच्या आत्महत्या झाल्या आता पोलीस प्रशासन काय पाऊल उचलणार हे महत्त्वाचे ठरणार आहे

{“AIGC”:{“ContentPropagator”:”001191441900557262083U10400″,”Label”:”1″,”ReservedCode1″:””,”ProduceID”:”edcc59e4-6dc7-4b8e-960d-a7aad82e6c08″,”ReservedCode2″:””,”PropagateID”:”edcc59e4-6dc7-4b8e-960d-a7aad82e6c08″,”ContentProducer”:”001191441900557262083U10400″}};

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button