महाराष्ट्र पुणे जिल्ह्यातील गावठी विषारी दारू मुळे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीमुळे अख्ख्या महाराष्ट्रात त्याचे पडसाद पडले त्याच अनुषंगाने जळगाव जिल्हयात मा.अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जळगाव श्री, व्हि ,टी.भुकन यांच्या नेतृत्वाखाली दि.29/5/26 ते दि.31/5/26 या कालावधीत एकुण 62 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत एकूण 41 आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे.

.
पुणे येथील गावठी विषारी दारू मुळे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीमुळे अख्ख्या महाराष्ट्रात त्याचे पडसाद पडले त्याचं अनुषंगाने जळगाव जिल्हयात मा.अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जळगाव श्री.व्हि.टी.भुकन यांच्या नेतृत्वाखाली दि.29/5/26 ते दि.31/5/26 या कालावधीत एकुण 62 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत एकूण 41 आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे.त्यांच्याकडून सुमारे 39095 लीटर रसायन व 1524 लीटर गावठी दारु मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्या मुद्देमालाची व रसायन कच्च्या मालाची एकुण किंमत ₹1682905/-इतकी आहे.सदर मोहीम ही देवुळवाडे शेळगाव शिरसोली ता. जिल्हा जळगाव. भुसावळ तालुक्यातील शिवपुर कन्हाळे ( खुर्द ) चोपडा तालुक्यातील नांदेड, उतराण, खारपाडा या परीसरात मोठ्या प्रमाणात रेड करण्यात आल्यामुळे गावठी दारू वाल्यांचे धाबे दणाणले आहेत आहे सदर मोहीमेत निरीक्षक भ.प. जळगाव अशोक तारु व त्यांचा स्टाफ,निरीक्षक जळगाव चकोर व त्यांचा स्टाफ,निरीक्षक भिसावळ रमेश राठोड व त्यांचा स्टाफ,निरीक्षक चाळीसगाव किशोर गायकवाड व त्यांचा स्टाफ,निरीक्षक चोपडा व त्यांचा स्टाफ यांनी मोहीम यशस्वी केली आहे.तरी जनतेस आवाहन करण्यात येते की, अवैध मद्य व गावठी दारू मीना परवाना निर्मिती वाहतुक व विक्री संदर्भात कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक 1800239999 व वॅट्स ॲप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधण्यात यावे असे अहवान करण्यात आले आहे.














