ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव भुसावळ नाहाटा महाविद्यालयात पालक शिक्षक संघाची 26 वी सभा संपन्न.अध्यक्षपदी प्राचार्य डॉ.बी.एच बऱ्हाटे तर उपाध्यक्षपदी सौ. आशा कैलास पाटील.


भुसावळ प्रतिनिधी (गोपी अण्णा) भुसावळ येथील कला, विज्ञान व पु. ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ (कनिष्ठ महाविद्यालय) मध्ये गुरुवार दिनांक 13/8/ 2026 रोजी 2026-27 साठी पालक शिक्षक संघ कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. सभेत इयत्ता 11वी व12वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण करून गुणगौरव करण्यात आला. कार्यकारणीच्याअध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.बऱ्हाटे, उपाध्यक्षपदी सौ.आशा कैलास पाटील व सचिव पदी प्रा डॉ. कुंदा मुरलीधर चौधरी यांची निवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक, चेअरमन श्री. महेश फालक, सचिव श्री विष्णू भाऊ चौधरी व कोषाध्यक्ष संजय कुमारजी नाहाटा यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कौतुक केले. तसेच उपप्राचार्य वाय.एम पाटील सरांनी प्रास्ताविक सादर केले. विद्यार्थ्यांमधून गुंजन अत्तरदे या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले तसेच माजी उपाध्यक्ष सौ. रजनीताई सावकारे व हिशोब तपासणी श्री. मुकेश अग्रवाल यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषण प्राचार्य डॉ.बी. एच. बऱ्हाटे यांनी केले सूत्रसंचालन प्रा. स्वप्ना फेगडे मॅडम यांनी केले तसेच आभार प्रा. एच बी राजपूत सर यांनी केले कार्यक्रमास पर्यवेक्षिका श्रीमती स्वाती पाटील, समिती सदस्य प्रा. जे. ए.चौधरी प्रा.एस एम फेगडे, प्रा. एस.एम सोनवणे,प्रा एच. बी राजपूत, प्रा जे टी बेंडाळे, प्रा एम. एल. गोसावी प्रा. एन.एस गवळी यांनी सहकार्य केले. तसेच सर्व शिक्षक वर्गाचे सहकार्य लाभले.

{“AIGC”:{“ContentPropagator”:”001191441900557262083U10400″,”Label”:”1″,”ReservedCode1″:””,”ProduceID”:”6d0ff78f-598f-442a-9fe7-a6a2150eeebc”,”ReservedCode2″:””,”PropagateID”:”6d0ff78f-598f-442a-9fe7-a6a2150eeebc”,”ContentProducer”:”001191441900557262083U10400″}};

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button