ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका भुसावळ वरणगाव येथील ‘इझी टू क्लीन कोटिंग्ज’ विषयावरील संशोधनासाठी डॉ. उत्कर्षा ग्वालवंशी (सपकाळे) यांना पीएच.डी.


वरणगाव, ता भुसावळ : भुसावल प्रतिनिधी /. (गोपी अण्णा) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील पेंट टेक्नॉलॉजी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. उत्कर्षा उमेश ग्वालवंशी (सपकाळे) यांना विद्यापीठातर्फे पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.डॉ. उत्कर्षा यांनी प्रा. डॉ. रवींद्र जी. पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली “Easy to Clean Coatings” (इझी टू क्लीन कोटिंग्ज) या विषयावर संशोधन पूर्ण केले. त्यांच्या संशोधन प्रबंधास विद्यापीठाने मान्यता दिल्यानंतर त्यांना पीएच.डी. पदवी बहाल करण्यात आली.पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रातील हे संशोधन स्वच्छता सुलभ करणाऱ्या, धूळ व डाग कमी चिकटणाऱ्या तसेच दीर्घकाळ टिकाऊ कोटिंग्जच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. उद्योग क्षेत्रासह संशोधन आणि तंत्रज्ञान विकासासाठीही या संशोधनाचा उपयोग होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.डॉ. उत्कर्षा या आयुध निर्माणी, वरणगाव येथे कार्यरत असलेले श्री. सचिन उत्तम सपकाळे यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. गोस्वामी, प्राध्यापक, कर्मचारीवृंद, संशोधक, सहकारी, नातेवाईक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून भावी शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button