ताज्या बातम्या

जळगाव शहरासाठी महावितरणला सब_ स्टेशनसाठीच्या जागांची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून पाहणी


जळगाव: शहरातील नागरिकांना अखंडित आणि सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेकडून हालचाली सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी बुधवारी (६ मे) शहरातील महावितरणच्या प्रस्तावित सब स्टेशनसाठी राखीव असलेल्या विविध जागांची प्रत्यक्ष पाहणी केली. महापौर दीपमाला काळे यांनी शहरातील विविध प्रस्तावित जागांची पाहणी करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. या प्राथमिक पाहणी दरम्यान, सब स्टेशन उभारताना कोणकोणत्या तांत्रिक आणि स्थानिक अडचणी येऊ शकतात, याची सविस्तर माहिती घेण्यात आली.या पाहणी दौऱ्याच्या वेळी नगरसेविका ॲड. शुचिता हाडा, महानगरपालिकेचे विजय मराठे (नगररचना विभाग), सुमित पाटील (विद्युत विभाग) यांच्यासह महावितरणचे अधिकारी जयदीप साळी आणि वाणी आदी अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button