ताज्या बातम्या

मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका; 7 गाड्या रद्द रेल्वे प्रवाशांना महत्त्वाची सूचना


भुसावळ प्रतीनीधी/_ गोपी आण्णा दि 24 मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भुसावळसह विविध मार्गांवरील सात रेल्वे गाड्या 24 आणि 25 जुलै रोजी पूर्णतः रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.24 जुलै रोजी रद्द गाड्या :
09050 भुसावळ–दादर विशेष – भुसावळ येथून पूर्णतः रद्द.
20925 सुरत–अमरावती एक्स्प्रेस – सुरत येथून पूर्णतः रद्द.
19105 उधना–भुसावळ एक्स्प्रेस – उधना येथून पूर्णतः रद्द.
19106 भुसावळ–उधना एक्स्प्रेस – भुसावळ येथून पूर्णतः रद्द.25 जुलै रोजी रद्द गाड्या :
20926 अमरावती–सुरत एक्स्प्रेस – अमरावती येथून पूर्णतः रद्द.
09051 दादर–भुसावळ विशेष – दादर येथून पूर्णतः रद्द.
09052 भुसावळ–दादर विशेष – भुसावळ येथून पूर्णतः रद्द. प्रवाशांना आवाहन : प्रवासाला निघण्यापूर्वी संबंधित गाडीची अद्ययावत स्थिती तपासूनच प्रवास करावा. झालेल्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची दिलगिरी व्यक्त केली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button