जि; जळगाव पाचोरा तालुक्यातील रामेश्वर ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराविरुद्ध पाचोरा पंचायत समितीत तक्रार// ग्रामसेवक मनमानी कोणत्या वेळेस करतात तर त्यांना सरपंच आणि काही सदस्य यांची पक्की साथ असते भ्रष्टाचार करण्या साठी ग्रामस्थ वाऱ्यावर// हीच खरी लोकशाही वरून ते खालपर्यंत सगळा भ्रष्टाचार कधीच सुधरतील बरोबर तर काहीच घेऊन जाणार नाही अतिशय विचित्र पद्धतीने लोक शाहीची थट्टा लावली त्यातील बरेच महाभाग म्हणतात मी पैसे घेत नाही मी चहा घेत नाही आणि गुपचूप सगळे सुरू राहते

पाचोरा: तालुक्यातील रामेश्वर ग्रामपंचायतीचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. येथील ग्रामसेवक कार्यालयीन वेळेत नियमित उपस्थित राहत नसल्याने ग्रामस्थांची कामे रखडली असून, संतापलेल्या नागरिकांनी आता थेट गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.याबाबत मुकेश गांगुर्डे (सामाजिक कार्यकर्ते) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ग्रामसेवक आठवड्यातून केवळ 1 ते 2 दिवसच कार्यालयात येतात. परिणामी, विविध दाखले प्रमाणपत्रे आणि शासकीय योजनांच्या लाभापासून ग्रामस्थ वंचित राहत आहेत. “शासन एकीकडे गतिमान प्रशासनाचा दावा करत असताना दुसरीकडे ग्रामसेवक मात्र कार्यालयाकडे पाठ फिरवत आहेत, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला असून, तक्रारीची प्रत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आली आहे.









