ताज्या बातम्या

धुळे महानगरपालिकेत भाजपाचा सर्जिकल स्टाईल ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी हैं जनतेच्या कष्टाच्या पैशाने पगार होतो, इमान जनतेशी राखा भ्रष्ट ठेकेदार आणि तोडीपाणी पावत्या फाडणाऱ्यांसोबत नाही”..पुढच्या वेळेस कामात कसूर किंवा भ्रष्टाचार करताना कोणीही आढळल्यास कायम स्वरूपी निलंबन करणार..जनतेच्या कामचुकार किंवा भ्रष्ट अधिकारी,कर्मचारी विरोधात तक्रारी असल्यास महापौर कार्यालय येथे लेखी स्वरूपात जमा कराव्यात.. धुळे महापौर मायादेवी परदेशी


धुळे महापालिकेत भाजपचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; १६ कामचुकार कर्मचाऱ्यांवर महापौरांनी उगारला निलंबनाचा बडगा! उबाठा टोळी उर्फ कचरा गॅंगच्या पोकळ विरोधाला ‘कर्तव्यशक्ती’चे चोख प्रत्युत्तर; आमदार अनुपभैय्या अग्रवाल आणि महापौर मायादेवी परदेशी यांचा दणका दुचाकीवरून गल्लीबोळ तुडवणाऱ्या महापौरांची कामचुकार प्रशासनाला शेवटची तंबी;सुधरा, अन्यथा कायमचे घरचा रस्ता दाखवू!’धुळे शहराच्या विकासाचा आणि स्वच्छतेचा प्रश्न जेव्हा जेव्हा येतो, तेव्हा भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व केवळ चर्चा करत नाही, तर थेट ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून दाखवते.धुळे शहराचे लोकप्रिय आमदार धर्मयोद्धा अनुपभैय्या अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली, धुळे शहर भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. गजेंद्रशेठ अंपळकर यांच्या विशेष पुढाकाराने आणि *महापौर सौ. मायादेवी परदेशी यांच्या खंबीर नेतृत्वात आज धुळे मनपा प्रशासनाने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.याच धडक कारवाईची माहिती देताना भाजपचे जिल्हा प्रवक्ता तथा उपाध्यक्ष पृथ्वीराज आधार पाटील यांनी पत्रकाद्वारे विरोधकांचा समाचार घेतला आहे. त्यांनी नमूद केले की कर्तव्यात कसूर करणाऱ्या व धुळेकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या १६ अधीकारी निरीक्षक व मुकारदम तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.आयुक्त नितीन कापडणीस: शिस्तीचा कणा धुळे महानगरपालिकेला शिस्त लावण्यासाठी मनपा आयुक्त श्री. नितीन कापडणीस यांनी नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आमदार अनुपभैय्या अग्रवाल, जिल्हाध्यक्ष गजेंद्रशेठ अंपळकर आणि महापौर सौ. मायादेवी परदेशी यांना लाभलेले आयुक्तांचे सहकार्य शहरासाठी उपयोगी ठरत आहे. कामकाजात कुचराई करणाऱ्यांना आयुक्त कधीही पाठीशी घालत नाहीत, हेच आजच्या कारवाईतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. महापौरांचा आदर्श एसी’ गाडी सोडून दुचाकीवरून ऑन फिल्ड’ संग्राम! महापौर पदाचा पदभार स्वीकारताच शासकीय वाहन आणि सर्व सेवा-सवलती नाकारून त्यागाचा आदर्श निर्माण करणाऱ्या महापौर सौ. मायादेवी परदेशी आज खऱ्या अर्थाने धुळे महानगरात कर्तव्यशक्ती’म्हणून ओळखल्या जात आहेत. आजही, त्या कोणतीही आलिशान गाडी न वापरता, भर उन्हात आपले **पती आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. महादेव परदेशी यांच्यासोबत दुचाकीवरून (टू-व्हीलर) शहराच्या गल्लीबोळात फिरून समस्या जाणून घेत आहेत. जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या या रणरागिणी नेतृत्वामुळेच आज प्रशासनातील कामचुकार यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. उबाठा’ टोळी उर्फ ‘कचरा गॅंग’ सणसणीत चपराक केवळ फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर रिकाम्या पोस्ट टाकून राजकारण करणाऱ्या उबाठा’ टोळीला उर्फ कचरा गॅंगला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणे-घेणे उरलेले नाही. विरोधासाठी विरोध करणे हेच त्यांचे एकमेव सूत्र बनले आहे. जनतेच्या सुख-दु:खात कधीही न दिसणारी ही टोळी उर्फ गँग’ फक्त सोशल मीडियावर स्वतःची पाठ थोपटून घेते. पण लक्षात ठेवा, धुळेकर जनता सुज्ञ आहे. महापौरांनी आणि प्रशासनाने केलेला हा सर्जिकल स्ट्राईक’ तुमच्या फोटोबाजी’ च्या राजकारणाला दिलेली चोख चपराक आहे कामचुकार प्रशासनाला महापौर सौ. मायादेवी परदेशी यांची थेट तंबी:धुळेकर जनतेचा पगार खायचा आणि कामाच्या वेळी टाळाटाळ करायची, हा प्रकार आता माझ्या धुळ्यात खपवून घेतला जाणार नाही! हे १६ जणांचे निलंबन तर फक्त एक ‘ट्रेलर’ आहे. जर महिनाभरात स्वतःला सुधारले नाही, तर खुर्च्या रिकाम्या करायला तयार राहा; तुम्हाला कायमचा घरचा रस्ता दाखवायला मी मागेपुढे पाहणार नाही. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्यांना यापुढे महापालिकेत थारा नाही. काम करायचे असेल तरच खुर्चीवर बसा, अन्यथा गाशा गुंडाळा!”धुळेकरांनो, निश्चिंत राहा… सक्षम नेतृत्व आणि शिस्तप्रिय प्रशासन तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे!


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button