ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका पाचोरा कुरंगी येथील डॉक्टर निलेश संजय पवार MD Medicine (Respiratory) या उच्च शिक्षणासाठी आग्रा येथील मेडिकल कॉलेज युनिव्हर्सिटी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन…!


जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील डॉक्टर निलेश संजय पवार यांची आग्रा येथील मेडिकल कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये एमडी मेडिसिन (रेस्पिरेटरी) या उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.डॉ. निलेश पवार यांनी आपल्या शैक्षणिक वाटचालीत सातत्याने परिश्रम घेत यश संपादन केले असून त्यांच्या या यशामुळे कुरंगी गावासह पाचोरा तालुक्याचा नावलौकिक वाढला आहे. त्यांच्या निवडीबद्दल परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
यावेळी जळगाव जिल्हा परिषदेचे मा. सदस्य श्री. पदम बापू पाटील, शिवसेना तालुका प्रमुख मा. विनोद भाऊ तावडे, वेरूळीचे माजी सरपंच बाळू तात्या, विशाल राजपूत विशाल हटकर, रोहित पाटील (माजी सरपंच नांद्रा), अमोल सूर्यवंशी (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष), किशोरभाऊ (दैनिक प्रहार जळगाव जिल्हा शहर प्रतिनिधी), निलेश पाटील (महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ उपतालुका अध्यक्ष) तसेच गौतम सोनवणे आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button