ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव शहरात महानगरपालिकेतर्फे भव्य स्वच्छता मोहीम 40 ट्रॅक्टर कचरा संकलित केला महापौर दीपमाला काळे


जळगाव:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांच्या आदेशानुसार शहरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जळगाव शहरातील सर्व 19 वार्डांमध्ये महापालिकेचा आरोग्य विभाग आणि स्थानिक नगरसेवकांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम अत्यंत उत्साहात पार पडली. या मोहिमेदरम्यान संपूर्ण शहरातून तब्बल 40 ट्रॅक्टर कचरा संकलित करण्यात आला.शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या मोहिमेत आरोग्य विभागाचे अधिकारी आणि 325 स्वच्छता कर्मचारी प्रत्यक्ष मैदानात उतरले होते. शहरातील विविध प्रभागांमध्ये संबंधित नगरसेवकांनी स्वतः उपस्थित राहून झाडू हातात घेत स्वच्छता कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला.महापौर दीपमाला काळे यांनी प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला व स्वतः स्वच्छता कार्यात भाग घेतला. “लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकत्र येऊन काम केल्यास शहर स्वच्छ ठेवणे अधिक सोपे होते. नागरिकांनीही आपल्या परिसरात स्वच्छता राखून या मोहिमेत सहकार्य करावे,” असे आवाहन या वेळी महापौरांनी केले.मनपा प्रशासन, सर्वपक्षीय नगरसेवक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शहरातील प्रमुख रस्ते चौक आणि गल्लीबोळांमधील साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. ड्रेनेज लाईन, गटारी देखील या मोहिमेमध्ये स्वच्छ करण्यात आले. मनपा आरोग्य विभागाच्या या तत्पर समन्वयाचे शहरवासियांकडून कौतुक होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button