जिल्हा जळगाव तालुका पाचोरा येथील नगरदेवळा येथे वीर जवान शहीद सैनिक भैय्यासाहेब बागुल स्मारकाचे भूमिपूजन व ‘वीर माती संकलन’ सोहळा संपन्न! मात्र एक प्रश्न कायमचा नगरदेवळा येथे बस स्टॅन्ड कधी होणार?

नगरदेवळा बु. (प्रतिनिधी): देशसेवेसाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या जवानांच्या स्मृती जपण्यासाठी व त्यांचा त्याग पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावा यासाठी शासनाने जळगाव जिल्ह्यातील 29 गावांमध्ये शहीद स्मारके उभे करण्यास 4 कोटी 35 लाख रुपयांच्या निधीला तात्काळ मंजुरी दिली आहे.पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे मा आमदार किशोर पाटील यांनी केलेल्या विशेष पाठपुराव्याची दखल घेत पालकमंत्री श्री गुलाबरावजी पाटील आणि दिवंगत उपमुख्यमंत्री मा अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) नाविन्यपूर्ण योजनेतून प्रत्येक स्मारकासाठी 15 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.याच उपक्रमांतर्गत नगरदेवळा बु. ग्रुप ग्रामपंचायतीच्या उत्कृष्ट आयोजनाखाली देशसेवा करताना आत्मबलिदान दिलेले वीर जवान शहीद सैनिक भैय्यासाहेब रोहीदास बागुल यांच्या स्मारक भूमीचे भूमिपूजन आणि ‘वीर माती संकलन’ सोहळा अत्यंत भावूक व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.तहसीलदारांच्या देशप्रेमाची अनवाणी प्रचिती: प्रोटोकॉल बाजूला ठेवून स्वतः पोहोचवली माती!या कार्यक्रमादरम्यान संकलित केलेली वीर माती आजच्या आजच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करणे अत्यंत आवश्यक होते. मात्र, वेळ कमी असल्याने ही माती इतक्या वेळेत जळगावला कशी पोहोचवायची अशी चिंता सरपंच श्री किरण काटकर सर यांनी व्यक्त केली.त्यावर क्षणाचाही विलंब न लावता तहसीलदार विजयजी बनसोडे साहेब यांनी अत्यंत संवेदनशीलतेने पुढाकार घेतला. मी स्वतः जळगावला चाललो आहे, ही माती मीच तात्काळ पोहोचवतो असा शब्द त्यांनी दिलाकुठलाही प्रशासकीय प्रोटोकॉल किंवा मोठेपणा न बाळगता, एका अधिकाऱ्याने दाखवलेले हे प्रत्यक्ष देशप्रेम पाहून उपस्थित ग्रामस्थ, माजी सैनिक व अधिकारी अवाक झाले आणि उपस्थितांनी साहेबांच्या या निर्णयाचे टाळ्यांच्या गजरात मनापासून कौतुक केले परंतु शेतकऱ्यांच्या अनुदानाचे काय झाले? असे प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केले पाहिजे होते जेव्हा तहसीलदार साहेब स्वतः शहीद जवानाच्या स्मारकाची माती घेऊन सैनिक कार्यालयात पोहोचले, तेव्हा तेथील अधिकारी व कर्मचारीही तहसीलदार यांची देशभक्ती आणि तत्परता पाहून आश्चर्यचकित झाले.26 वर्षांनंतरही आठवणी जपणे अभिमानास्पद; हे श्रेय संपूर्ण गावाचे व सैनिकांचे – तहसीलदार विजयजी बनसोडे कार्यक्रमात बोलताना तहसीलदार विजय बनसोडे यांनी नगरदेवळा ग्रामस्थांचे कौतुक केले. ते म्हणाले की, “वीर जवान भैय्यासाहेब बागुल यांना देशसेवा करताना शहीद होऊन आज 26 वर्षे उलटून गेली आहेत, तरीदेखील नगरदेवळा गाव आणि येथील ग्रामस्थ त्यांच्या आठवणी तितक्याच आदराने व आपुलकीने जपत आहेत, ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे. खरे तर या पवित्र कार्याचे आणि देशभक्तीच्या परंपरेचे सर्व श्रेय हे नगरदेवळा गाव आणि येथील आजी-माजी सैनिकांना जाते.”पुढे बोलताना तहसीलदार व सरपंच किरण काटकर सर म्हणाले की, “आपले सैनिक सीमेवर अहोरात्र पहारा देतात, प्राणाची बाजी लावतात आणि रक्त सांडतात. त्यांच्या या महान त्यागामुळेच आपण सर्वजण सुरक्षित आहोत. त्यामुळे आपण सर्वांनी सैनिकांच्या या त्यागाची सदैव जाणीव ठेवून त्यांचा सर्वोच्च सन्मान केला पाहिजे भैय्या साहेबांचे बलिदान व्यर्थ गेले नाही आज गावातील शेकडो तरुण लष्करात!- कॅप्टन ज्ञानेश्वर महाजन या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना आजी-माजी सैनिक संघाचे प्रमुख ऑनररी कॅप्टन श्री. ज्ञानेश्वर महाजन साहेब यांनी शहीद जवानाच्या पराक्रमाची आठवण करून देत अत्यंत भावूक विचार मांडले. ते म्हणाले की, “वीर जवान भैय्यासाहेब बागुल यांनी देशरक्षणासाठी लढताना आणि शत्रूचा सामना करताना आपल्या अंगावर 30 गोळ्या झेलल्या आणि मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांचे हे शौर्य आणि बलिदान कधीही व्यर्थ गेलेले नाही. आज त्यांच्या याच असीम देशभक्तीची आणि त्यागाची प्रेरणा घेऊन नगरदेवळा गावातील शेकडो तरुण भारतीय सैन्यात भरती होऊन सीमेवर देशसेवा करत आहेत.तहसीलदारांनी जाणून घेतल्या माजी सैनिकांच्या अडचणी; प्रशासनाला तात्काळ सूचना कार्यक्रमादरम्यान तहसीलदार विजय बनसोडे साहेब यांनी दिल्या उपस्थितांशी संवाद साधत माजी सैनिकांच्या विविध अडी-अडचणी आणि प्रशासकीय प्रश्न अत्यंत आपुलकीने जाणून घेतले. या अडचणी प्राधान्याने व वेळेत सोडवण्याबाबत त्यांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणेला अधिकाऱ्यांना तात्काळ आवश्यक त्या सूचना दिल्या. तहसीलादारांच्या या तत्परतेमुळे माजी सैनिकांनी समाधान व्यक्त केले.वीरमाता तुळसाबाई बागुल व सैनिकांची विशेष उपस्थिती नगरदेवळा ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास शहीद भैय्यासाहेब बागुल यांच्या वीरमाता श्रीमती तुळसाबाई रोहीदास बागुल यांची विशेष उपस्थिती लाभली होती. तसेच आजी-माजी सैनिक संघाचे प्रमुख ऑनररी कॅप्टन श्री. ज्ञानेश्वर महाजन साहेब आणि त्यांच्या सहकारी सैनिकांनी हुतात्मा जवानाला आदरांजली वाहिली. माजी सैनिकांच्या वतीने तहसीलदार विजयजी बनसोडे साहेब यांचा नागरी सत्कार करण्यात आला प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थांची उपस्थिती नगरदेवळा बु. ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित या सोहळ्यास स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने: किरण काटकर सर (सरपंच, नगरदेवळा बु.) राहुल पवार (मंडळ अधिकारी, नगरदेवळा बु.)
तात्याराव सपकाळ (ग्राम महसूल अधिकारी, निपाणे)बबन मंडले (ग्राम महसूल अधिकारी, पिंपळगाव)उमेश सोनवणे (ग्राम महसूल अधिकारी, आखतवाडे)तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी आणि गावातील नागरिक व ज्येष्ठ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्मारकाच्या निर्मितीमुळे नगरदेवळा परिसरातील भावी पिढीमध्ये देशभक्तीची ज्योत सदैव तेवत राहील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.












