जिल्हा जळगाव भडगाव तालुक्यातील AEG फाउंडेशनच्या वतीने कृषी उद्योजकांना प्रमाणपत्रांचे वितरण//////// आपली सुखा-दुःखाची चौकशी करणारं कोणी नसलं की मनात दाटलेल्या हुंदक्यांना शांतताच सावरून घेते कारण माणूस एकांतात स्वतःच्याच आठवणींच्या दुनियेत रमून जातो

भडगाव प्रतिनिधी विजय माळी
AEG फाउंडेशनच्या ADVANTA प्रकल्पांतर्गत कृषी उद्योजकता विकास उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थी कृषी उद्योजकांचा प्रमाणपत्र वितरण सोहळा आज शनिवारी भडगाव येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भडगाव तालुका कृषी मंडळ अधिकारी श्री प्रताप खाडे सर होते प्रमुख उपस्थितीमध्ये प्रकल्प प्रमुख श्री. रंगकुमार अहाड सर प्रकल्प समन्वयक श्री माधव किशवे सर प्रकल्प समन्वयक सुजित गोहाळ तसेच उमेदचे श्री. प्रशांत परदेशी सर विनोदभाऊ बोरसे रवींद्र बापू पाटील उपस्थित होते ADVANTA प्रकल्पांतर्गत कृषी उद्योजकांना विविध कृषीपूरक व्यवसायांचे प्रशिक्षण व्यवसाय नियोजन, आधुनिक शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय निविष्ठा निर्मिती व वापर तसेच शाश्वत शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक व शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना यशस्वी कृषी उद्योजक म्हणून घडविणे हा उद्देश आहे यावेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कृषी उद्योजकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले तसेच कृषी उद्योजकांनी प्रशिक्षणातून मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय विकसित करावा व इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करावे असे आवाहन मान्यवरांनी केले कार्यक्रमाचे आयोजन AEG फाउंडेशन भडगाव यांच्या वतीने करण्यात आले









