ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका भुसावळ तुकाराम नगर मधील गणेश मंडळाचा स्तंभ पूजन लोगो अनावरण सोहळा संपन्न


भुसावळ प्रतिनिधी गोपी अण्णा
शहरातील तुकाराम नगर मधील सुहर्ष फाउंडेशन संचलित दुर्वांकुर गणेश मंडळाचा स्तंभ पूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे ,नगरसेविका सोनल महाजन छाया देशमुख,गिरणारी मठाचे मठाधिपती ब्रह्मानंद स्वामी,स्वामीनारायण मंदिराचे स्वामी मुक्त स्वरूप,स्वामी चंद्रप्रकाश,स्वामी हरी प्रसाद दास,इनरव्हील क्लबच्या कविता पाचपांडे,उद्योगपती मनोज बियाणी , नगरसेवक किरण कोलते,समाजसेवक बापू महाजन,रुपेश देशमुख,पुरुषोत्तम नारखेडे, व सुहर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष सुमित बऱ्हाटे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात विधिवत स्तंभ पूजन मंडप पूजन मान्यवरांच्या करण्यात आले.तसेच महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .प्रसंगी मंडळाचा लोगो अनावरण करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते मंडळाचे टी शर्ट अनावरण कार्यक्रम सुद्धा उत्साहात संपन्न झाला .दुर्वांकुर गणेश भुसावळच्या गणेशाचे भुसावळचा गणाध्यक्ष म्हणून यावेळी नामकरण करण्यात आले यापुढे याच नावाने भुसावळ येथे गणेश उत्सव साजरा केला जाईल असे मंडळाचे अध्यक्ष सुमित बऱ्हाटे यांनी सांगितले यावेळी रजनी सावकारे ,स्वामी मुक्त स्वरूप व शैलजा नारखेडे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र गवळी यांनी केले तर आभार सोपान कोल्हे यांनी मानले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहर्ष फाउंडेशनचे पदाधिकारी व महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले

{“AIGC”:{“ContentPropagator”:”001191441900557262083U10400″,”Label”:”1″,”ReservedCode1″:””,”ProduceID”:”e9e3381d-6a81-4132-a4ba-e9c5092fb6a5″,”ReservedCode2″:””,”PropagateID”:”e9e3381d-6a81-4132-a4ba-e9c5092fb6a5″,”ContentProducer”:”001191441900557262083U10400″}};
{“AIGC”:{“ContentPropagator”:”001191441900557262083U10400″,”Label”:”1″,”ReservedCode1″:””,”ProduceID”:”fce09455-8e55-44dd-805c-9a324a00e0b1″,”ReservedCode2″:””,”PropagateID”:”fce09455-8e55-44dd-805c-9a324a00e0b1″,”ContentProducer”:”001191441900557262083U10400″}};
{“AIGC”:{“ContentPropagator”:”001191441900557262083U10400″,”Label”:”1″,”ReservedCode1″:””,”ProduceID”:”a8d65752-c87a-47c0-9c4a-2d46da2748e1″,”ReservedCode2″:””,”PropagateID”:”a8d65752-c87a-47c0-9c4a-2d46da2748e1″,”ContentProducer”:”001191441900557262083U10400″}};

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button