जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ बालकांना पोलिओ डोस देण्याचे आव्हान दोन थेंब आरोग्याचे कवच जळगाव जिल्ह्यातून पोलिओ मुक्त भारताचा निर्धार जळगावचे आ.राजूमामा भोळे, जळगाव शहर महानगर पालिका महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

जळगाव : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान 2026 अंतर्गत, जळगाव शहर महानगरपालिकेच्या दवाखाना विभागातर्फे रविवारी (28 जून) शहरात पल्स पोलिओ मोहिमेची उत्साहात सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला धन्वंतरी देवतेचे पूजन करून मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. आमदार राजूमामा भोळे आणि महापौर दीपमाला काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लहान बालकांना पोलिओ डोस देऊन या मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला आमदार राजूमामा भोळे यांनी, “बाळ आणि बाळंत माता यांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांनी विशेष काळजी घेतली पाहिजे,” असे प्रतिपादन या प्रसंगी केले. महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले की, जळगाव शहरातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांच्या पालकांनी आपल्या मुलांना पोलिओ डोस देऊन, त्यांना भविष्यातील संभाव्य अपंगत्वापासून (पोलिओ) वाचवावे, असे आवाहन केले. तसेच 30 जूनपासून शहरात घरोघरी जाऊन हे लसीकरण केले जाईल. त्यावेळी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे अशी माहितीही त्यांनी दिली.या प्रसंगी उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, आरोग्य विभागाचे उपसंचालक दिलीप सौंदळे आणि नगरसेवक दीपक सूर्यवंशी उपस्थित होते. तसेच वैद्यकीय व आरोग्य यंत्रणेतील राष्ट्रीय हिवताप अभियानाचे अधिकारी के. बी. नगराळे, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ, डॉ. राम रावलानी, डॉ. स्वप्नील सोनवणे आणि इन्चार्ज परिचारिका प्रिया सूर्यवंशी यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते



















