पुणे येथील सुरेंद्र अग्रवाल व शहा बिल्डर्स यांनी कोंढवा पोलीस स्टेशन दत्तक घेतले का असा प्रश्न कापरे परिवार विचारत आहे परप्रांतीयांनी पुन्हा डोके वर काढले मराठी माणसांना त्रास देत आहेत

पुण्याच्या कापरे परिवार यांच्या मूळ जागेवर सुरेंद्र अग्रवाल व शहा बिल्डर्स जागा बळकावत आहे यांच्या गुंडगिरीला कंटाळून कापरे कुटुंबीयांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निषेध नोंदवला पुणे येथील स, न, 31 व 32 मिळकत कोंढवा येथील कापुरे परिवाराची पिढी जात मिळकत असून सदर मिळकतीचा ताबा कापुरे परिवार यांच्याकडे असून सदर मिळकतीबाबत सुरेंद्र कुमार अग्रवाल (ब्रह्म बिल्डर्स) व सुजय श्रेणिक शहा (क्लिअर टायटल प्रमोटर अँड बिल्डर्स) यांच्यासोबत कापुरे परिवार यांचे वाद सुरू असून सदर वाद हे में: न्यायालयात प्रलंबित आहे परंतु दिनांक 21/ 12/ 2024 रोजी वरील दोन्ही बिल्डर्स यांनी (आधीच 20/ 12/ 2024 रोजी पोलीस स्टेशन येथे भेट घेऊन) तोंडाला काळे कपडे बांधून 40 ते 50 जणांचा जमाव आणून घुसकोरी करत कापरे यांच्या मिळकतीत दाखल झाले व जेसीबी आणून झाडे तोडू लागले त्यात शासकीय क्रमांक असलेले चार झाडे तोडली मारहाण करून कापरे यांचे सीसीटीव्ही कॅमेरा व डीव्हीआर संगणक त्यांच्यासमोर जबरदस्ती घेऊन गेले कापरे कुटुंबीयांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता आलेल्या गुंड इसमांनी कापरे कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली त्या गुंडांनी सांगितले की आम्ही सुरेंद्रकुमार अग्रवाल व शहा यांच्याकडून ताबा घेण्याचे काम घेतलेले आहे म्हणजेच सुपारी घेतली आहे तुम्ही मुकाट्याने जागा खाली करून द्या कालच्या दिवशी वरील दोन्ही बिल्डरांनी पोलिसांशी संपर्क करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या आहे आता आमचं कोणीच काही वाकडं करून घेणार नाही सदर ही बाब कापरे कुटुंबियांनी लागलीच 112 या नंबर वर फोन करून पोलिसांना माहिती देऊन मदत मागितली तेव्हा पोलीस घटनास्थळी येऊन गेले त्यानंतर पोलिसांनी सांगितले की कापरे व तुमचे कुटुंब पोलीस स्टेशनला या कापरे कुटुंब पोलीस स्टेशनला गेले असता कापरे कुटुंबीयांच्या लक्षात आले की पोलीस स्टेशनला विरुद्ध पार्टीचे गुंड आलेच नाही सर्व प्रकार चालू असताना शहा बिल्डर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बसलेले होते कापरे कुटुंबियांनी हा सगळा प्रकार झालेला सांगितला तुम्ही या प्रकरणाची केस दाखल करा असे सांगूनही पोलिसांनी कापरे यांची केस नोंदवायला नकार दिला कापरे कुटुंबीयांना पोलीस स्टेशन मधून निघून जाण्यास सांगितले यापुढे तुमच्या मिळकतीचे संरक्षण तुम्हीच करा असे पोलिसांनी सांगितले कापरे यांना फोन वरून असे समजले की सकाळचे गुंड पुन्हा जागेत घुसून झाडे तोडत आहे ही बाब पोलिसांना सांगून सुद्धा पोलीस ऍक्शन घेत नव्हते उलट त्या जागेवरती 8 ते 10 पोलीस पाठवून तिथेच बसून राहिले व कापरे यांना सांगितले की आम्ही ते गुंड बाहेर काढणार नाही तुमचे तुम्ही पाहून घ्या जर काही वाद झाले तर तुम्हाला जेलमध्ये टाकू अशी धमकी दिली त्यानंतर लेखी तक्रार कापरे यांनी कोंढवा पोलीस स्टेशनला गेले त्यावर पोलिसांनी काही एक ॲक्शन घेतली नाही त्यानंतर कापरे कुटुंबीयांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात जिल्हाधिकार्यालयावर 26/ 12/ 2024 रोजी आंदोलन करून निषेध नोंदवला आमची तक्रार पोलीस स्टेशन घेत नाही आमची तक्रार कोणी घेतली नाही तर आम्ही गृहमंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहे यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत असे लेखी निवेदनाद्वारे कापरे कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे प्रशासनाने न्याय दिला नाही तर आमरण उपोषण शेवटी आत्मदहन करू असा इशारा दिला आहे आमच्यावर कितीही संकट गुंडगिरी हत्यारे आणली तरी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढा देऊ परप्रांतीय बिल्डर मराठी माणसांना धमकावत आहे कापरे यांनी दहा वर्षापासून शेती करणे बंद केले ही जागा आमची वडलोपार्जित आहे त्या जागेवर आमची जुनी घर आहे जुनी घर बिल्डरने पडल्यामुळे आम्ही नवीन शेड 14 जून 2024 मध्ये आम्ही मूळ मालक यांनी बांधले सुधारणा होत असलेल्या जागेवर गेल्या 7 ते 8 महिन्यापासून बिल्डर अग्रवाल आणि शहा यांनी आमच्या जागेवर जबरदस्ती घुसखोरी करून आम्हाला त्रास देत आहे आमच्या मूळ जागेवर अग्रवाल व शहा यांचे गुंड आम्हाला जीवे ठार मारण्याची धमकी देत आहे



