जनतेने केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा आ. किशोर पाटील पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर संपन्न!साडे पाच हजार लाभार्थ्यांना मिळाला लाभ !

पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर आपल्या दारी शासनाच्या विविध योजनांचा लाभ, मार्गदर्शन व सेवा देण्यासाठी दि.30 जुलै गुरुवार रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजे दरम्यान मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेत तर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र कृषी विकास महामंडळ गोडाऊन, गिरड रोड, डीवायएसपी कार्यालया समोरिल गोडाऊन जागेत शिबिर पार पडले.या कार्यक्रमात केंद्र व राज्य सरकारच्या विविध 19 स्वरूपाच्या कल्याणकारी योजनांतर्गत दोन्ही तालुक्यातील सुमारे पाच ते साडे पाच हजार लाभार्थ्यांना लाभ मिळाला.या प्रसंगी जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समिती सभापती गणेश पाटील, उप नगराध्यक्ष किशोर बारवकर, उप सभापती पि.ए. पाटील, भाजपा पदाधिकारी मधुकर काटे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उप कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, मुख्याधिकारी मंगेश देवरे,भडगाव तहसीलदार शीतल सोलाट, वन अधिकारी सरिता पाटील,भडगाव तालुका कृषी अधिकारी दिपक ठाकूर, माजी जी.प.सदस्य पद्मसिंग पाटील, संजय पाटील,शेतकरी सेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, आणि दोन्ही तालुक्यातील प्रशासनातील सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.शिबिरात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रशासनाच्या योजनाची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात आ किशोर पाटील म्हणाले की, महा राजस्व शिबिरांच्या माध्यमातून एकाच छताखाली जनतेची प्रशासनात रखडलेली कामे मार्गी लावता येतात. तसेच शेतकरी, शेती संदर्भात असलेल्या अडीअडचणी, समस्या, शेतरस्ते, बाबत तक्रारी निवारण होते. जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. घुगे यांचे मार्गदर्शनात प्रांताधिकारी भूषण अहिरे आणि तहसीलदार विजय बनसोडे, भडगाव आणि सर्वच विभागांचे अधिकारी , कर्मचारी परिश्रम घेत असून आमदारांनी सर्वांचे कौतुक केले. मात्र विशेषत: पंचायत समिती आणि महसूल विभागांमध्ये योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी दलाल सक्रीय झाले आहे. त्यांचा जिल्हाधिकारी यांनी बंदोबस्त करावा तसेच पंचायत समितीच्या प्रशासनात काही अधिकारी लाभार्थ्यांकडून दहा हजार रुपये घेतल्या शिवाय कामे करीत नसल्याचा गंभीर आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि राज्यात फडणवीस यांनी जनहितासाठी सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांचे मतदार संघातील जनतेने लाभ घेण्याचे आवाहन केले.या समाधान शिबिरात 7/12 अंतर्गंत मयताचे नाव कमी करुन वारस नोंदी घेणे, डिजीटल 7/12 व फेरफार नोंदी वाटप करणे उत्पन्न दाखला, डोमीसाईल सर्टिफीकेट नॉन क्रिमीलेअर, जातीचे दाखले वाटप करणे,संजय गांधी योजना चे लाभार्थी यांचे अर्ज भरुन सविस्तर माहिती देणे लाभार्थी यांना कागदपत्रा बाबत माहिती देणे, लाभार्थी यांनी मंजुर झालेली प्रकरणे बाबत केवायसी माहिती, मंजुर लाभार्थी यांना प्रमाणपत्र वाटप करणे,पुरवठा विभाग रेशनकार्ड वाटप करणे नवीन रेशनकार्ड बाबत अर्ज स्वीकारणे,रेशन कार्डातील नाव कमी करणे व नाव वाढविणे कामी अर्ज स्वीकारणे प्राधान्य कुटुंब योजनेचे लाभ देण्यात येणार आहे. कृषि विभाग पी.एम. किसान योजने बाबत माहिती देणे, त्याबाबत अर्ज स्वीकारणे, प्रलंबित ॲग्रीस्टॅक बाबत मंजुरी देणे महाविस्तार ॲप डाऊनलोडींग बाबत माहिती देने विविध योजनेंतर्गंत एकुण 30 यंत्राचे वाटप करणे.विद्युत वितरण विभाग सोलर रुफ टॉप ची माहिती देणे, स्मार्ट मीटरची माहिती नवीन कनेक्शन संदर्भात माहिती,
पंचायत समिती विभाग केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनांतर्गंत लाभासाठी आवश्यक कागदपत्र माहिती कृषी विभागांतर्गत जिल्हा परिषद पंचायत समिती शेष योजने नुसार लाभांच्या योजनांची माहिती व्ही. जी. राम या नविन योजनेची अमंलबजावणी करणे, अनुदान विहीर मागणी/शेड मागणी बाबतची माहिती मिळेल. तसेच पात्र अर्जदाराचे अर्ज स्वीकारले जातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनेची माहिती मिळेल व त्या बाबतचे अर्ज स्वीकारले जातील.वनविभाग वन्य प्राण्यांच्या हल्यामुळे झालेले नुकसान भरपाई बाबत करावयाची कारवाई भूमी अभिलेख विभाग ऑनलाईन नक्कला , ऑनलाईन मोजणी अर्ज याबाबत माहिती स्वामीत्व योजनेंतर्गंत माहिती पोट हिस्सा बाबत मोजणी बाबत माहिती आरटीओ विभाग या ठिकाणी ड्रायविंग परवाना बाबत माहिती वाहनांची नोंदणी बाबत माहिती, परिवहन महामंडळ अमृत महोत्सव योजनेंतर्गंत महिलांना 50 टक्के टिकीट सवलत तसेच 75 वर्षावरील वृध्दांना मोफत प्रवास पोलीस/वाहतूक विविध कायद्यांची माहिती मिळू शकते. वाहतुकीचे नियम माहिती होऊ शकतात वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय आयुष्यमान गोल्डन कार्ड वाटप करणे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित आरोग्याची काळजी घेणे शस्त्रक्रिया अधिक कामांची लागणारी माहिती त्या कामासाठी लागणारे कागदपत्रे कोणती याबाबत माहिती मिळू शकते महिला व बालविकास विभाग लेक लाडकी योजना बाबत लेक लाडकी योजना बाबत माहिती मातृ वंदना योजना बाबत माहिती पौष्टिक आहार बाबत माहिती महिलांचे आरोग्य बाबत माहिती शिक्षण विभाग गटशिक्षणाधिकारी मुलांना शैक्षणिक सुविधांचा लाभ या ठिकाणी मिळेल व वैद्यकीय विभाग शेतकरी बांधवांना पशुपालन बाबतची योजना माहिती सबसिडी बाबत माहिती दिली जाईल जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 100% अनुदानावर मका बियाणे वाटप करणे लाभार्थ्यांना नाविन्यपूर्ण शेळी गट व दुधाळ गट योजनेअंतर्गत प्रमाणपत्र वाटप करणे नगरपालिका पाचोरा प्रधानमंत्री आवास योजना शहरी बाबतची माहिती पी एम स्वाधीनी बाबतची माहिती माता रमाई आवास योजना बाबतची माहिती महिला बचत गट अंतर्गत योजनेची माहिती सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कर्जमुक्तीचा लाभ घेण्याबाबत माहिती देणे नियमित कर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर लाभ घेणे डॉक्टर पंजाबराव देशमुख योजनेअंतर्गत व्याज सवलत योजनेची माहिती देण्यात आली राष्ट्रीयकृत बँकेतून मिळणारे कर्जाबाबत मार्गदर्शन बी एस एन एल विभाग आपल्या मोबाईलवर किंवा याबाबतचे जोडणी व माहिती देण्यात आली









