जिल्हा जळगाव ता भडगाव ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा अचानक संपर्क तुटला; भडगाव तालुक्यात प्रशासनात खळबळ

भडगाव (प्रतिनिधी)– भडगाव तालुक्यातील अंजनविहीरे येथील रहिवासी तसेच वरखेड व पिंपळगाव बु. ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी श्री. जिवराम हिलाल पाटील हे दि. २९ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास पाचोरा येथून कोणालाही न सांगता निघून गेले असून, ते अद्यापपर्यंत परत न आल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार, श्री. पाटील यांचा त्यानंतर कोणाशीही संपर्क झालेला नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच सहकारी ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शोध सुरू केला असला तरी अद्याप त्यांचा काहीच ठावठिकाणा लागलेला नाही.या घटनेमुळे ग्रामपंचायत प्रशासनातही खळबळ उडाली असून, संबंधित अधिकारी व नागरिकांकडून त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोणाला श्री. जिवराम पाटील यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.संपर्कासाठी मोबाईल क्रमांक : 8390777232,7666619656, ग्रामपंचायत अधिकारी बंधू-भगिनी तसेच नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, संबंधित व्यक्तीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित वरील क्रमांकावर किंवा संबंधित ग्रुपवर कळवावी.









